कोयत्याच्या धाकावर लुटणाऱ्या टोळीतील आरोपी जेरबंद…
कोयत्याच्या धाकावर लुटणाऱ्या टोळीतील आरोपी जेरबंद…
धाराशिव (प्रतिनिधी) – कारमध्ये अंत्यविधीसाठी जाणाऱ्या कुटुंबाला कोयत्याचा धाक दाखवून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटणाऱ्या टोळीतील एका आरोपीस मिळालेली गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषण यांच्या आधारावर शिताफीने अटक करण्यात धाराशिव एलसीबीला यश मिळाले आहे. त्याच्याकडून गुन्ह्यातील गेल्या माला पैकी 30,000₹ रोख रक्कम व एक काळ्या रंगाची बायोमॅट्रीक मशीन असा एकुण 32,000₹ किंमतीचा माल हस्तगत केला असून त्याच्या अन्य तीन साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत.
फिर्यादी नामे – शफीक युन्नुस शेख, (वय 38 वर्षे), रा.खिरणीमळा धाराशिव ता.जि.धाराशिव हे (दि.03 फेब्रुवारी) रोजी साडेपाच वा.सु. तुळजापूर नळदुर्ग बायपास उड्डानपुलाच्या सर्व्हीस रोडच्या कच्या रस्त्यावर हंगरगा शिवारातून आई, पत्नी आणि चुलत भाऊ हे सगळे फोर्ड फेस्टा कार क्र.16 एटी 2393 ने धाराशिव येथुन हैद्राबाद येथे अंत्यविधीसाठी जात होते. या वेळी अज्ञात 4 इसमांनी फिर्यादीची कार आडवली त्यातील एका इसमाने पाठीमागचा दरवाजा उघडून कोयत्याचा धाक दाखवून पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकुण 77,000₹ माल जबरीने लुटून पसार झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शफीक शेख यांनी (दि.03फेब्रुवारी) रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे गुन्हा क्र. 40/2024 हा कलम 392, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला होता.
गुन्हा तपासादरम्यान पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्याच्या कार्यपध्दीच्या व मिळालेल्या तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे मोहा, ता. कळंब येथील – गुड्या उर्फ प्रकाश शहाजी काळे, (वय 21 वर्षे) रा. मोहा, ता.कळंब जि.धाराशिव यास गुन्हा घडल्यापासून अवघ्या काही दिवसात म्हणजेच (दि.08 फेब्रुवारी) रोजी साडेसात वा.सु. मोहा येथुन ताब्यात घेतले.
त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने प्रथमत: पोलीसंना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्याने सदर गुन्हा त्याच्या अन्य तीन साथीदारांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. पोलीसांनी त्याच्या ताब्यातून गुन्ह्यातील गेल्या माला पैकी 30,000₹ रोख रक्कम व एक काळ्या रंगाची बायोमॅट्रीक मशीन असा एकुण 32,000₹ किंमतीचा माल हस्तगत केला. काळ्या रंगाची बायोमॅट्रीक मशीन या बाबत माहिती घेतली असता सदर बाबत पोलीस ठाणे येरमाळा येथे गुरन 49/2023 कलम 392, 34 भ.द.वि.सं. प्रमाणे गुन्हा नोंद असल्याबाबत खात्री झाली. आरोपीला चोरीच्या मालासह तुळजापूर पोलीसांच्या ताब्यात दिले असून त्याच्या अन्य तीन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.
अशा प्रकारे सदरची कामगीरी ही पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोउपनि संदीप ओहोळ, सपोफौ वलीउल्ला काझी, पोलीस हावलदार विनोद जानराव, जावेद काझी, अमोल निंबाळकर, समाधान वाघमारे, शौकत पठाण, फरहाण पठाण, नितीन जाधवर, अशोक कदम, सुनिल मोरे, महेबुब अरब, रत्नदिप डोंगरे, मपोहा शैला टेळे, रंजना होळकर यांच्या पथकाने केली आहे.