अंगावर शिंकला म्हणून चेहऱ्यावर सॅनिटायझर टाकून पेटवून दिलं

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

अंगावर शिंकला म्हणून चेहऱ्यावर सॅनिटायझर टाकून पेटवून दिलं….

मुंबई (प्रतिनिधी) – मुंबईच्या अंधेरीतील डी.एन. नगर परिसरात अंगावर शिंकला म्हणून १६ वर्षाच्या मुलाच्या चेहऱ्यावर सॅनिटायझर टाकून पेटवून दिल्याची घटना घडली. पीडित मुलावर कूपर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पीडित मुलाच्या आजीने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून, एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.





मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा बुधवारी सायंकाळी नमाजासाठी जातो असे सांगून घरातून बाहेर पडला. त्यानंतर काही वेळाने तो रडत आपल्या घरी आला. त्यावेळी त्याचा चेहरा आणि कानाचा काही भाग जळालेला दिसला. याबाबत आजीने विचारले असता पीडित मुलाने परिसरातील मुलाने त्याच्या चेहऱ्यावर सॅनिटायझर टाकून पेटवून दिल्याची माहिती दिली. यानंतर आजीने त्याला ताबडतोब कूपर रुग्णालयात दाखल केले. आणि लगेच आरोपी मुलाविरोधात डी.एन. पोलिस ठाण्यात तक्रार दिली.



पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, पीडीत मुलगा त्याच्या एका मित्रासोबत मोबाईलमध्ये व्हिडिओ पाहत होता. त्यावेळी आरोपी मुलगा त्यांlच्याजवळ येऊन उभा राहिला. मात्र, त्याचवेळी पीडित मुलगा शिंक आली आणि तो आरोपी मुलाच्या अंगावर शिंकला, यावर संतापलेल्या आरोपी मुलाने घरी जाऊन सॅनिटायझर आणि लायटर आणले. रागाच्या भरात त्याने पीडित मुलाच्या चेहऱ्यावर सॅनिटायझर टाकून पेटवून दिले. मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर मुलांनी पाणी टाकून आग विझवली. या प्रकरणी डी.एन. नगर पोलिस अधिक तपास करीत आहेत.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!