
मिरा-भायंदर गुन्हे शाखेचा पालघर येथे ड्रग साठी कच्चा माल पुरविणार्या कारखाण्यावर छापा..
मिरा-भायंदर – सध्या महाराष्टभर चर्चेत असलेले ललित पाटील MD ड्रग प्रकरण आणि त्या पार्श्वभुमीवर सर्वत्र होणार्या कार्यवाह्या त्यात मग मुंबई पोलिस,पुणे पोलिस त्यापाठोपाठ आता मिरा-भायंदर पोलिसांनी कंबर कसलेली दिसतेय लागोपाठनाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर नंतर आता पालघर जिल्ह्यात मिरा- भाईंदरच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. ड्रग्ज
बनवण्यासाठीचा कच्चा माल या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात पोलिसांकडून कारवाईंमुळे ड्रग्ज तस्करांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
यामुळे महाराष्ट्रात अंमली पदार्थ विकणाऱ्या टोळीचे कंबरडे मोडण्यात पोलिसांना यश आले आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज प्रकरण चांगलेच गाजत आहे. दररोज या प्रकरणात वेगवेगळी माहिती समोर येत असते. ड्रग्समाफिया
ललित पाटीलला काही दिवसांपूर्वी मुंबई पोलीसांनी चेन्नईमधून अटक केली. त्यानंतर खऱ्या अर्थाने तपासाला वेग आला आहे. पालघरमधील मोखाडा तालुक्यात ड्रग्जचा कारखाना असल्याची माहिती मिरा-भाईंदर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर
मिरा-भाईंदरच्या गुन्हे शाखेने ही गुप्त कारवाई केली आहे. या कारवाईमुळे पालघरमध्ये एकच खळबळ उडाली होती या कारवाईबाबत एवढी गोपनीयता बाळगण्यात आली होती की, स्थानिक पोलिसांकडे याची माहिती नाही. या कारवाईत कोट्यवधी
रुपयांचे साहित्य जप्त केल्याची माहिती समोर येत आहे.




