
पेट्रोललियम कंपनीमध्ये भागीदारी करण्याचे आश्वासन देऊन फसवणुक करणाऱ्या विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल…
पेट्रोलपंप व्यवसायात नफ्याचे आमिष दाखवुन फसवणुक; गुन्हा दाखल…
नागपूर ( शहर प्रतिनिधी) – फिर्यादीला पेट्रोलपंप मध्ये गुंतवणूक करून व्यवसायामध्ये होणाऱ्या नफ्यातून ३० टक्के नफा देण्याचे आमिष दाखवुन तसे आश्वासन देवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. आणि जेव्हा नफ्याची रक्कम परत मागितली तेव्हा आरोपींनी चेक देऊन ते नमूद बँकेत वटविण्यासाठी टाकले असता चेक बाउंस झाले. आणि फसवणुक केली. अशी फिर्याद


लतिश कुमार भरतन तेलंगखेडी, रा.नागपूर

यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी

विजयन पिल्लई,
श्रीमती विजयाकुमारी विजयन पिल्लई आणि
नझीम हनीफा रॉथर सर्व रा. कन्ननकुझी मुरी, थमरकुलम गांव, ता.मवेलीकारा, जि.अल्लापुझा, राज्य- केरळ
यांच्यावर भा.दं.सं. ९४/२०२४, कलम ४२०, ४०६ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
या बाबत अधिक माहिती अशी की, यातील फिर्यादी लतिश कुमार भरतन, तेलंगखेडी, नागपूर यांना विजयन पिल्लई व श्रीमती विजयाकुमारी पिल्लई व नझीम हनीफा रॉथर यांनी त्यांचे जया फ्युअल्स कट्टानम, केरळ येथील पेट्रोलपंप मध्ये गुंतवणूक करण्यास सांगुन पेट्रोलपंप व्यवसायामध्ये होणाऱ्या नफ्यातून ३० टक्के नफा देण्याचे आमिष दाखवुन तसे आश्वासन देवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. सन २०१२ पासुन ते आज पावेतो फिर्यादीने गुंतवणूक केलेल्या नफ्यासह रक्कम परत मागितली असता एकुण १,८१, ९४,०००/- रू. रक्कमेचे पुढील तारखेचे २ चेक देवून नमुद चेक बँकेत वटविण्यासाठी टाकले असता दोन्ही चेक बाउंस झाले. अशा प्रकारे विजयन पिल्लई, विजयाकुमारी पिल्लई व नझिम हनीफा सर्व रा. कट्टानम, केरळ यांनी संगणमताने फिर्यादी कडून पेट्रोलपंप व्यवसायाकरीता दिलेली रक्कम व नफा असे मिळुन १,८१, ९४,०००/- रू.ची आर्थिक फसवणुक केली. अशी फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून अंबाझरी पोलिस ठाण्यात सदर गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहेत.


