
सराईत दुचाकी चोरट्यांना ताब्यात घेऊन नवीन कामठी पोलिसांनी उघड केले ५ दुचाकी चोरीचे गुन्हे…
वाहन चोरी करणाऱ्या रेकॅार्डवरील आरोपींना अटक करुन एकुण ०५ गुन्हे उघडकीस. आणुन ०७ वाहने केली जप्त,नवीन कामठी पोलिसांची कामगिरी….
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक (२७)एप्रील रोजी पोलिस ठाणे नविन कामठी हद्दीत दीदी कॉलनी, कामठी, नागपूर येथे राहणारे फिर्यादी मोहंमद यासीन कमाल अर्शद कमाल वय २५ वर्ष यांनी पोलिस स्टेशनला तक्रार दिली की दि. २६.०४.२०२४ चे ११.०० वा. ते दि. २७.०४.२०२४ चे ०६.०० वा. चे दरम्यान, त्यांची सुझुकी बर्गमॅन दुचाकी, काळया रंगाची क्र. एम. एच ४० सी एन २६१३ किंमती ८०,००० /- रू ची लॉक करून घरासमोर पार्क करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात आरोपीने गाडी चोरून नेली. फिर्यादी यांनी पोलिस ठाणे नविन कामठी येथे दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३७९ भा.दं.वी अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.


गुन्हयाचे तपासात पोलिस ठाणे नविन कामठी येथील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रीक तपास करून तसेच मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून सापळा रचुन गुन्हयातील आरोपी १) मोहंमद नौशाद उर्फ नस्सो मोहंमद रईस अहमद वय १९ वर्ष रा. प्लॉट नं. ९३४, महेबुबपुरा, योगी अरविंद नगर, नागपूर याला सुझुकी बर्गमॅन दुचाकी, काळया रंगाची क्र. एम.एच ४० सी एन २६१३ किंमती ८०,००० /- रू सह ताब्यात घेवुन त्याचे जवळील
वाहना संबंधी विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्हयातील वाहन आरोपी क्रं. २) मोहंमद इमरान उर्फ चुहा मोहंमद असलम अंसारी वय २३ वर्ष, रा. अंसार नगर, डोबी, तहसील, नागपूर दोघांनी मिळुन चोरी केल्याचे सांगीतले.तसेच यातील आरोपी क्रं. २) मोहंमद इमरान हा पोलिस ठाणे पाचपावली येथील चोरीचे गुन्हयात मध्यवर्ती कारागृह येथे बंद असल्याचे सांगीतले. मोहंमद इमरान यास मध्यवर्ती कारागृह येथुन प्रॉडक्शन वॉरंटवर घेवुन आरोपींची अधिक सखोल विचारपूस केली असता, त्यांनी वरील गुन्हयातील गाडी व्यतीरिक्त २) पोलिस ठाणे नविन कामठी हद्दीतुन ग्रे रंगाची
अॅक्टीव्हा गाडी क्र. एम. एच ३१ एम.एफ ८४९८ किंमती ४०,०००/- रूची, ३) पोलिस ठाणे सदर हद्दीतुन एक ग्रे रंगाची अॅक्टीव्हा गाडी क्र. एम. एच ४९ वाय ११९० किंमती ४०,०००/- रू ची, ४) पोलिस ठाणे यशोधरा नगर हद्दीतुन हिरो होंडा कंपनीची गाडी क्र. एम. एच ४९ बी क्यु ७०७२ किंमती ४०,००० /- रूची, ५) पोलिस ठाणे
नंदनवन हद्दीतुन काळया रंगाची स्प्लेंडर क्र. एम.एच ४९ ए डी ३८९१ किंमती ३०,००० /- रू ची, चोरी केल्याची कबुली दिली.

आरोपीचे चौकशीतुन वरील पाच गुन्हे उघडकीस आणण्यात आले. तसेच त्यांचे ताब्यातुन एकुण ०५ चोरी केलेली वाहने एकुण किंमत २,३०,००० /- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना पोलिस ठाणे नविन कामठी येथील वाहन चोरीचे गुन्हयात अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. तपासादरम्यान
पोलीस ठाणे हद्दीतुन एक पांढऱ्या रंगाचा बर्गमॅन सुझुकी गाडी क्र. एम. एच ४९ बी. एस २५४५ किंमती २०,०००/- रू ची तसेच काळया रंगाची अॅक्टीव्हा क्र. एम.एच ३१ सि.डी ८६७५ किंमती १०,०००/- रू ची लावारीस स्थितीत मिळुन आल्या आहे. त्यांचे चेचिस व इंजेन नंबर वरून पुढील तपास करून कारवाई करण्यात येईल

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविंद्र सिंघल,सहपोलिस आयुक्त अस्वती दोरजे,अप्पर पोलिस आयुक्त, (उत्तर विभाग), पोलिस उपायुक्त (परि ५) निकेतन कदम,सहायक पोलिस आयुक्त (कामठी विभाग) विशाल क्षिरसागर यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि. प्रमोद पोरे, सपोनी सचिन यादव, पो.हवा. विशाल मेश्राम, पोशि विशाल पौनीकर, राहुल वाघमारे, नसीम अंसारी, हेमचंद सोनोने यांनी केली.


