सराईत वाहन चोरट्यास कळमना पोलिसांनी ताब्यात घेऊन उघड केले ४ गुन्हे….
अट्टल वाहन चोरट्यास कळमना पोलिसांनी ताब्यात घेऊन उघड केले ४ गुन्हे,एकुन २२००००/-रु चा मुद्देमाल केला हस्तगत…
नागपुर(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ०८.०४.२०२४ चे ०२.५० वा. ते ०३.०० वा. चे दरम्यान, पोलिस ठाणे कळमणा हद्दीत, प्लॉट नं. ४४, गुलशन नगर, कळमणा, नागपूर येथे राहणारे फिर्यादी मोहम्मद इरशाद मोहम्मद निसार, वय ३५ वर्षे यांनी त्यांची हिरो मोटरसायकल क्र. एम.एच ४९ ए. एन १३४७ किंमती ३०,००० /- रू ची ही पार्क करून, लॉक करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली अशा फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाणे कळमणा येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३७९ भा.दं.वी अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान कळमणा पोलिसांचे पथक पेट्रोलींग करीत असतांना त्यांना प्रतिभा लॉन जवळ एका काळया रंगाचे दुचाकीवर बसलेला ईसम संशयीत वाटल्याने पोलिसांनी त्यास बोलाविले असता तो पळुन गेला.पोलिसांनी त्याचा पाठलाग करून वाहनासह ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने आपले नाव उस्मान खान वल्द अकबर खान वय २० वर्ष रा. मुस्लीम कब्रस्तान जवळ, पिवळी नदी, कपिलनगर, नागपूर असे
सांगीतले त्यास ताब्यात घेवुन मोटरसायकल बाबत विचारपूस केली असता, त्याने वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीस गुन्हयात अटक करून पोलिस कोठडी प्राप्त करण्यात आली.
त्या दरम्यान आरोपीने पोलिस ठाणे कळमणा हद्दीत वरील गुन्हयाव्यतीरिक्त एक पोलिस ठाणे हुडकेश्वर येथे एक व मौदा नागपुर ग्रामीण येथुन एक अशा एकुण चार मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुन एक बिना नंबर असलेली हिरो कंपनीची दुचाकी तसेच पॅशन प्रो क्र. एम. एच ३१ ई. आर ६०३४ व होन्डा कंपनीची ग्रे रंगाची अॅक्टीव्हा ५ जी नंबर नसलेली व बजाज पल्सर एम.पी ५० एम. एन ७०५२ असे एकुण ५ वाहने किंमती १,५०,००० /- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच पोलिस ठाणे कळमणा येथील दाखल गुन्हयातील पाहिजे आरोपी असलेला अट्टल वाहन चोरटा प्रशिल उर्फ मोनू उर्फ रायडर संजय जाधव यास अटक करून त्याचे ताब्यातुन एक दुचाकी किंमती ७०,०००/- रूची जप्त करण्यात आली.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविंद्र सिंघल,सह पोलिस आयुक्त,अश्वती दोर्जे,अपर पोलिस आयुक्त उत्तर विभाग प्रमोद शेवाळे,पोलिस उपायुक्त परीमंडळ ५ निकेतन कदम, सहायक पोलिस आयुक्त (कामठी विभाग)विशाल क्षिरसागर,यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलिस निरीक्षक गोकुळ महाजन,सपोनि. उज्वल इंगोले, पोउपनि रामलोड, सफौ. मुटकुरे, पोहवा. विशाल अंकलवार, विशाल भैसारे, पोशि यशवंत अमृते, ललीत शेंडे व वसीम देसाई यांनी केली.