अवैधरित्या गांजाची विक्री करणारे रेकॅार्डवरील गुन्हेगार अंमली पदार्थ विरोधी पथकाचे ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अंमली पदार्थ विरोधी पथकाने अवैधरित्या गांजा विक्री करणारे रेकॅार्डवरील गुन्हेगार घेतले ताब्यात,६ किलो गांजा केला जप्त…

नागपुर(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक २९.०३.२०२४ चे ६..५५ वा. ते १०.१० वा. चे दरम्यान, गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार हे गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना पोलिस ठाणे गिट्टीखदान हद्दीत, नविन काटोल नाका चौक येथे एक इसम गांजा विक्रीकरीता घेवुन येणार आहे. अशा मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून सापळा रचुन गांजा विक्रीकरीता आलेला आरोपी नामे





१) अभिषेक देवशंकर वर्मा वय २५ वर्ष रा. येरला, कळमेश्वर, जि. नागपूर,



तसेच खरेदी करीता आलेले आरोपी



२) विक्रांत चंद्रकांत टकले वय ३७ वर्ष रा. सादीकाबाद कॉलोनी, अवस्थी नगर चौक, मानकापूर, नागपूर

३) अरविंद मधुकर कोडापे वय ३३ वर्ष रा. रामनगर,तेलंगखेडी, अंबाझरी, नागपूर

यांना ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यातुन विक्री करीता आणलेला ओलसर गांजा वजनी ६ किलो ७८० ग्रॅम किंमतीचा १,३५,६०० /- रू. चा मिळुन आला तसेच आरोपींचे ताब्यातुन गांजा, तिन अॅक्टीव्हा गाडी, एक मोबाईल असा एकुण ३,४०,६०० /- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींचे साथिदार

४) पंकज उर्फ बाबू चिनी रा. मकरधोकडा, ५) दिनेश नावाचा ईसम रा. रामटेके नगर

हे दोघे घटनास्थळाहुन पळुन गेले. आरोपींचे हे कृत्य कलम ८(क), २०(ब) २ (ब) २९ एन.डी.पी.एस. अॅक्ट नुसार होत असल्याने, आरोपींविरूध्द पोलिस ठाणे गिट्टीखदान येथे गुन्हा नोदविण्यात आलेला आहे. आरोपींना अटक करुन मुद्देमालासह पुढील कारवाई कामी पोलिस ठाणे गिट्टीखदान यांचे ताब्यात देण्यात आले.

सदरची कामगिरी  पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल,सहपोलिस आयुक्त अश्वती दोरजे,अपर पोलिस आयुक्त गुन्हे संजय पाटील,पोलिस  उपायुक्त (डिटेक्शन)निमित गोयल, सहा. पोलिस आयुक्त (गुन्हे) अभिजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली,पोलिस निरीक्षक गजानन गुल्हाने, सफौ. सिध्दार्थ पाटील, विजय यादव, अनिल अंबाडे, मनोज नेवारे, विवेक अढाऊ, मपोहवा. अनुप यादव, नापोशि पवन गजभिये, राशीद शेख, पोशि सुभाष गजभिये, शेषराव रेवतकर,चिखले, रोहीत काळे, राहुल पाटील यांनी केली.

 

 

 

 

 





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!