
सॅनीटरी पॅड च्या नावावर लाखो रु च्या पानमसाला गुटख्याची चोरटी वाहतुक करणारा कंटेनर कळमेश्वर पोलिसांनी घेतला ताब्यात,१ कोटीचेवर मुद्देमाल केला जप्त….
महाराष्ट्रात प्रतिबंधीत अशा सुगंधी पान मसाल्याची वाहतुक करणारे कंटेनर ताब्यात घेऊन,१८ लक्ष रु चा गुटखा केला जप्त…
कळमेश्वर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सहा.पोलिस अघिक्षक अनिल मस्के यांना गोपनीय माहीती मिळाली की एक कंटेनर महाराष्ट्रात प्रतिबंधीत अशा सुगंधीत पान मसाला गुटख्याची चोरटी वाहतुक करणार आहे त्या अनुषंगाने सदर कंटेनर शोधुन त्याचेवर कार्यवाही करण्यासाठी आदेशीत केले होते


त्यानुसार दि(८). रोजी रात्री ०९.०० वा दरम्यान सावनेर ते चौदा मैल रोडने एका कंटेनर मध्ये प्रतिबंधीत सुगंधी पान मसाला वाहतुक होणार असल्याने पोहवा अतुल शेंडे व स्टाफ ला रवाना केले असता त्यांना पेट्रोलिंग दरम्यान कंटेनर क्रमांक एचआर ४७ डी४१०४८ हा बिपी पेट्रोलपंप जवळ संशयीत रित्या मिळुन आला. त्यांनी कंटेनर चालक वसीम खान याला विचारपुस केली असता तो हा कंटेनर घेऊन हैद्राबादला जात इसल्याचे सांगीतले त्यासंबंधाने त्यासंबंधी कागदपत्रे बघीतली असता त्याच्यावर सॅनीटरी पॅड चे पावती होती यावरुन त्या चालकावर संशय बळावल्याने व त्याने समाधान कारक उत्तर न दिल्याने कंटेनर मधुन सुगंधीत पान मसाला सारखा वास येत असल्याने वाहन पोस्टे ला कारवाई करीता डिटेन करण्यात आले.

पंचासमक्ष पंचनामा करून वाहनाचे मागील सील तोडुन वाहनातील प्लास्टीक चुमडयाची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत राजनिवास नावाचे लेबल असलेला पान मसाला व जाफरानी जर्दा तंबाखु मिळुन आला. सदर कंटेनर मध्ये एकुण राजनिवास पान मसाला चे पॅकेट असलेल्या १७६ चुमड्या एकुण वनज ६७५८.४ किलोग्रॅम कि. ६७,५८,४००/–रू चा माल व जाफरानी जर्दा तंबाखु चे ३५ चुमड्या एकुण वजन १८९० किलोग्रॅम १८,९०,०००/- रू चा माल व कंटेनर किमत ४०,००,००० /- रू असा एकुण १,२६, ४८, ४००/- रू चा माल जप्त करण्यात आला असुन श्रीमती एस व्ही भामके यांचे तक्रारीवरून वाहन चालक वसीम खान क्लीनर साहुद खान, वाहन मालक, मालक खरेदी व विक्री करणा-या विरूध्द विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार,अपर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ,सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी ,सावनेर अनिल मस्के यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक योगेश कामाले, पोलिस उपनिरीक्षक पल्लवी काकडे, व स्टॉफने पार पाडली.


