
सहा पोलिस अधिक्षकाचे पथकाची क्रिकेट बुकीवर छापा,नागपुर येथील सामन्यावर खेळवित होते जुगार….
नागपुर येथे सुरु असलेल्या भारत विरुध्द ईग्लंड एकदिवशीय क्रिकेटच्या सामन्यावर सट्टा/बेटिंग लावुन जुगार खेळणार्यावर पारशिवनी पोलिस स्टेशन हद्दीत सहा पोलिस अधिक्षक अनिल मस्के यांचे पथकाचा छापा…
सावनेर(नागपुर)प्रतिनीधी – पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर ग्रामीण पोलीसांनी IPL सट्टा/बेटिंग करणारे संशयीत 64 आरोपींना आधीच स्थानबद्ध केले होते तरीसुध्दा काही सराईत बुकी नागपुर शहरानजीकच्या शेतात,फार्महाऊसवर जावुन तिथे आपला गोरखधंदा चालवित होते त्यानुसार नागपुर येथे सुरु असलेल्या भारत विरुध्द ईग्लंड एकदिवशीय क्रिकेटच्या सामन्यावर सट्टा/बेटिंग लावुन जुगार खेळणार्यावर पारशिवनी पोलिस स्टेशन हद्दीत सहा पोलिस अधिक्षक अनिल मस्के यांचे पथकाचा छापा टाकुन ५ सराईत बुकींना ताब्यात घेतले


याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. 06/02/25 रोजी पोलिस ठाणे पारशीवनी हद्दीतील मौजा शिलादेवी गाव शिवारातील मंगेश खापेकर यांच्या फॉमहाऊस वर भारत v/s इंग्लंड दरम्यान नागपुर येथे खेळल्या जात असलेल्या एकदिवशीय क्रिकेट सामन्यावर बेटिंग/क्रिकेट सट्टा खेळविल्याबाबत गोपनीय माहीती सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी सावनेर अनिल मस्के यांना मिळताच त्यांचे पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता त्याठिकाणी मोबाईल हॉटस्पॉट चा वापर करून, लॅपटॉप वर शुभ लाभ सॉफ्टवेअर ज्याची ID 0265 व 0448 तसेच अँड्रॉइड मोबाईल मध्ये FRZ 1 New या aplication ID चा वापर करून पैश्याची हार, जीत चा गेम खेळवणारे 05 सराईत आरोपीं 1)विशाल गजानन खापेकर वय 36 रा. वैशाली नगर नागपूर 2) संकेत राजकुमार यादव वय 30. रा , सदर नागपूर.3) गौरव राजेश श्रीवास वय 22, रा, नागपूर 4)गौरव दिगंबर टामने वय 29. र, नागपूर5) इंद्रकुमार सिकंदर चौप वय 21, र, बिहार.हे संघटित रित्या मोबाईल फोन द्वारे भारत विरुद्ध इंग्लंड या संघादरम्यान खेळला जाणाऱ्या एक दिवसीय सामन्यात लोकांकडून पैसे घेऊन क्रिकेट सट्टा खेळविताना मिळून आल्याने त्यांचे विरुद्ध अनुक्रमे 112, 49 BNS सहकलम 4,5 म.जू.का. अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तसेच त्यांचेकडुन 1) 04 नग लॅपटॉप एकूण की, 2,00,000/-
2) 24 नग वेगवेगळी कंपनी चे अँड्रॉइड मोबाईल 5,00,000/- रु असा एकूण 7,00,000/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच कागदपत्रे पुढील कायदेशीर प्रक्रियेकरीता पोलिस ठाणे पारशिवनी यांचे ताब्यात देण्यात आले.यातील मुख्य आरोपी लोकेश खत्री हा फरार असुन त्याचा शोध सुरु आहे

सदरची कामगिरी ही पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार,अपर पोविस अधिक्षक रमेश धुमाळ,सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी सावनेर यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने केली


