
गोवंशाची अवैध वाहतुक करणाऱ्याच्या केळवद पोलिसांनी आवळल्या मुसक्या….
अवैधरित्या गाई गौवंशाची वाहतुक करणारे केळवद पोलिसांचे ताब्यात,6 गोवंशाची केली सुटका….
केळवद(नागपुर)ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक-04/03/2024 चे रात्री 01/00 वाजता चे दरम्यान रोजी सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेश साखरकर ठाणेदार पोलिस स्टेशन केळवद व त्यांच्या पोलिस पथकास गोपनीय माहीती मिळाली की पांढुर्णा कडुन नागपुर कडे जाणा-या हायवे वरील मौजा बिहाडा फाटा मार्गे गोवंशाची अवैध वाहतुक होणार आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर ठिकाणी नाकाबंदी करीत असताना 1) इंडिका विस्टा कार क्र एम.एच-02 बी.पी.-312 व 2) होंन्डा सिटी कार क्र एम.एच-17 टी-0818 या दोन्ही कार च्या चालकांनी आपले ताब्यातील कार नाकाबंदीचे ठिकाणी न थांबविता यु टर्न ( पलटवुन) पांढुर्णा हायवे ने जागा, माळेगाव होत नांदागोमुख येथील जीवन बावणकर यांचे घरासमोरील डांबरी रोडवर आपले ताब्यातील वाहन सोडुन दोंन्ही कार चालक हे अंधाराचा फायदा घेउन शेतातुन पळुन गेले सदर नमुद दोंन्ही कारची पंचासमक्ष पाहणी केली असता इंडिका विस्टा कार क्र
एम.एच-02 बी.पी.-312 किंमत-4,00,000/- रुपये व त्यातील 1) नग गाई/ कालवड गौवंश प्रत्येकी किंमत 15,000/- रु प्रमाने किंमत- 75,000/- रु, 2) 1 नग मृत गाई/कालवड गौवंश किंमत-00/-रुपये व होंन्डा सिटी कार क्र एम.एच-17 टी-0818 किंमत-4,00,000/- रुपये 1) 6 नग गाई गौवंश प्रत्येकी
किंमत 15,000/- रुपये प्रमाने किंमत- 90,000/- रुपये असा एकुन – 9,65,000/- रुपये च्या गाई गौवंश जनावरांना अत्यंत क्रुर व निर्यदयतेने वाहनात डांबुन दोरीने पाय व तोंड बांधुन चारा पाण्याची सोय न करता दाटीवाटीने अपु-या जागेत कोंबुन कत्तलीसाठी अवैद्यरित्या वाहतुक करताना मिळुन आल्याने
सदरचा मुद्देमाल जप्त करुन सदर गुन्हातील 1) इंडिका विस्टा कार क्र एम.एच-02 बी.पी.-312 व 2) होन्डा सिटी कार क्र एम.एच-17 टी-0818 चा चालक या दोन्ही इसमांन विरुद्ध कलम- 429,279,34 भादवी सहकलम-11(1)(घ)(ड)(च) प्राण्यांना निर्देयतेने वागविने प्रतिबंधक अधिनियम-1960 सहकलम-5 (अ),
9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 सहकलम- 119 महाराष्ट्र पोलीस अधिनियम सहकलम-184 मो.वा.का अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हातील आरोपीचा शोध सुरु आहे.


सदरची कार्यवाही ही हर्ष पोदार पोलिस अधिक्षक नागपुर (ग्रा),रमेश धुमाळ अप्पर पोलिस अधिक्षक नागपुर (ग्रा), अनिल मस्के उप विभागिय पोलिस अधिकारी सावनेर विभाग, सावनेर यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि राकेश साखरकर ठाणेदार पो.स्टे केळवद, पोशि धोंडुतात्या देवकत्ते, पोशि श्रीधर कुलकर्णी,पंकज शहारे यांनी केली



