
बुटीबोरी पोलिस स्टेशन हद्दीतील टाकळघाट येथील सराफास लुटणारे नागपुर ग्रामीण पोलिसांचे ताब्यात…
टाकळघाट येथील अतुल ज्वेलर्स या सराफ दुकानदाराला लुटणाऱ्या दोन गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या 48,62,540/-कमतीचे सोने व चांदीचे दागीने केले हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणने केलेली धडाकेबाज कार्यवाही…
बुटीबोरी(नागपुर ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की,MIDC बुटीबोरी पोलिस स्टेशन हद्दीतील टाकळघाट बाजारातील अतुल ज्वेलर्सचा मालक श्री अतुल रामकृष्ण शेरेकर हे दि. 02/12/2023 रोजी रात्री 9.00 वाजताचे सुमारास दुकान बंद करुन सोने-चांदीच्या दागीण्याची बॅक घेवून त्यांचे कारने खापरी मोरेश्वर गावी घरी परतत असतांना रस्त्यामध्ये दोन अनोळखी युवकांनी त्यांचे वाहनाला समोरुन दुचाकी वाहनाने धडक देवून थांबवीले व त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकुन सराफाचे कारमधील सोने-चांदी व नगदी रक्कम असलेली बॅग पळविली, यासंबधात पोलीस ठाणे MIDC बोरी येथे जबरी चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षत घेवून नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी नागपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती पुजा गायकवाड यांना MIDC बोरी आणि बुटीबोरी पोलिसांचे 2 तपास पथके तयार केले. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे 4 विशेष पथके तयार करुन आरोपी शोध घेवून गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले. तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने नमुद गुन्हयातील दोन्ही अनोळखी आरोपींचा शोध
सुरु केला. यादरम्यान टाकळघाट ते वर्धा रोड लगतच्या परिसरात आरोपींचा शोधण्यास सुरुवात केली. तसेच तांत्रीक पुराव्यांचे आधारे व गोपनिय बातमीदार नेमुन आरोपींचा शोध सुरु केला
असता दि. 08/12/2023 रोजी नमुद गुन्हयातील दोन्ही आरोपी राहुलनगर वस्ती, सोमलवाडा येथे एका घरी थांबुन असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने राहुल नगर वस्तीतुन 1) कृष्णा उर्फ जॉन तिवडूजी पंचेश्वर वय 27 वर्ष, रा. घर नं. 18, श्रमीक नगर, हनुमान मंदीर जवळ परसोडी तह.जि. नागपूर ह.मु. व्दारा श्रीमती सुशीला महादेव काकडे यांचे घरी किरायाणे राहुल नगर, सोमलवाडा, नागपूर आणि 2) अशोक कोंदू चौधरी वय 24 वर्ष रा. श्रमीक नगर, परसोडी रेल्वचे लाईन जवळ, खापरी तह. जि. नागपूर यांना ताब्यात घेतले. दोन्ही आरोपीची कसून चौकशी करण्यात आली असता त्यांनी सदरचा
गुन्हा केल्याचे कबूल करुन गुन्हयात चोरी केलेला मुद्देमाल त्यांचे जवळ असल्याचे सांगीतले. दोन्ही आरोपींकडून सोन्याचे दागीने एकुण वजन 729.700 ग्रॅम किंमती 40,59,120 /- रु आणि चांदीचे दागीने 7,30,000 /- रु. तसेच गुन्हयात वापरलेले वाहन मोपेड क्र. MH 31 DF 8234 किं. 50,000/-रु., दोन मोबाईल फोन किं. 20,000/- रु. रोख रक्कम 3420 /- रुपये असा एकुण 48,62,540 /- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.


यातील आरोपी जॉन हा काही दिवसांपुर्वी चोरीच्या प्रकरणात नागपूर कारागृहात बंदीस्थ होता, कारागृहात त्याची ओळख शुभम नावाच्या आरोपीसोबत झाली होती. शुभम याने त्याना सांगीतले होते की, टाकळघाट बाजारातील अतुल ज्वेलर्स चा सराफ व्यापारी हा घरी जातेवेळी सोने-चांदीची बॅग सोबत ठेवतो. त्याला लुटले तर मोठा फायदा होईल. जॉन याने कारागृहातुन सुटल्यानंतर त्याचा बालपणीचा मित्र अशोक चौधरी याला शुभम याने दिलेली टिप सांगीतली. दोघांनी मिळून टाकळघाटच्या सराफ व्यापार्याला रस्त्यामध्ये लुटन्याची योजना तयार केली. यासाठी जॉन याने ऑक्टोंबर 2023 मध्ये पोलिस स्टेशन प्रतापनगर हद्दीतुन एक दुचाकी वाहन चोरी केले होते. व ते वाहन अशोक याला घटना घडवून आणण्यासाठी दिले होते. सदर वाहनाने अशोक हा सदर सराफाचे कारला समोरुन धडक देईल व जॉन हा त्याचे कारचे मागे राहुन त्याला मदत करण्याचे निमीत्याने संधी साधून त्याचे डोळयात मिरची पावडर टाकणार अशी योजना तयार केली. ठरल्याप्रमाणे दोन्ही आरोपींनी दि. 02/12/2023 रोजी टाकळघाट
ते खापरी मोरेश्वर मार्गावर सुनसान स्थळी सराफ व्यापाराची गाडी गाठून अशोक याने गाडीचे समोरुन धडक देवून सदर सराफ व्यापार्याला जॉन याने सराफाला मदत करण्याचा बहाना करुन त्याचे जवळ आला व मिरची पावडर सोनाराच्या डोळयात फेकून त्याचे कारमधील सोने चांदीची बॅग पळविली. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने दिवस रात्र परिश्रम करुन
व कौशल्यपुर्ण समांतर तपास केला व दोन्ही आरोपींना शोधून काढले तसेच त्यांचेकडून गुन्हयात चोरी गेलेला 100 टक्के मुद्देमाल हस्तगत करुन गुन्हा उघडकिस आणला आहे.
सदरची कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार,अपर पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, नागपूर विभागाच्या उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती पुजा गायकवाड यांचे मार्गदर्शनात, पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, महादेव आचरेकर, भिमाजी पाटील, सहा. पोलिस निरीक्षक, राजीव कर्मलवार, पोलीस उपनिरीक्षक आशिष मोरखेडे, बट्टूलाल पांडे, पोलिस हवालदार दिनेश आधापूरे, मिलींद नांदुरकर, विनोद काळे,
ईक्बाल शेख, संजय बांते, प्रमोद भोयर, शंकर मडावी, उमेश फुलबेल, किशोर वानखडे, नितेश पिपरोदे, गजेन्द्र चौधरी, अरविंद भगत, मयूर ढेकळे, रोहन डाखोरे, अमृत किनगे, राकेश तालेवार, चालक पोलिस हवालदार अमोल कुथे, पोलिस शिपाई सुमीत बांगडे, आशुतोष लांजेवार तसेच सायबर सेलचे पोलिस उपनिरीक्षक भारत थिटे, नायक सतिश राठोड, स्नेहा ढवळे यांनी पार पाडली.



