
डोंगरगाव पारधी बेडा येथे काटोल पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेची दारुभट्टीवर वॅाशआऊट मोहीम…,
काटोल(नागपुर ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक ०१/११/२०२३ चे ०३.०० वा. दरम्यान पोस्टे काटोल हद्दीतील डोंगरगांव पारधी बेडा येथे मोठया प्रमाणावर अवैध गावठी दारू तयार करून आजुबाजुचे परिसरात विक्री करणार असल्याची गोपनीय खबर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्याने पोलिस स्टेशन काटोल हद्दीतील डोंगरगांव पारधी बेडा येथे सुरू असलेल्या मोहाफुल गावठी दारू भट्टीवर रेड केली असता आरोपी
१) महेन्द्र प्रितम राजपूत वय २८ वर्ष, रा. पारधी बेडा डोंगरगांव


२) विक्की आमच्या राजपूत वय २८ वर्ष, रा. पारधी बेडा डोंगरगांव

, ३) दिनेश तेजा मारवाडी वय २० वर्ष, रा. पारधी बेडा डोंगरगांव

४) संजय अवचीत सोलकी वय ३७ वर्ष, रा. पारधी बेडा डोंगरगाव
५) अमरसिंग आमच्या राजपूत ३० वर्ष, रा. डोंगरगाव
व ०५ महिला आरोपी यांचे ताब्यातून
१) मोहफुल सडवा एकुण ५२०० लिटर किंमती १०४००० /- रुपये २) मोहफुल गावठी दारु एकुण ३०५ लिटर किंमती १५२५० /रुपये
३) लोखंडी ड्रम व इतर साहीत्य किंमती १४५०० /- रुपये
एकुण १,३३,७५०/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करून एकुण १० आरोपींवर पोलिस स्टेशन काटोल येथे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भा.पो.से), अपर पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सपोनि आशिष ठाकुर,सफौ चंद्रशेखर घडेकर, ज्ञानेश्वर राऊत, सुरज परमार, पोलीस हवालदार दिनेश आधापूरे, प्रमोद तभाने, संजय बान्ते,नितू रामटेके, पोलीस नायक होमेश्वर वाईलकर, मुकेश शुक्ला महिला पोलीस नायक वनीता शेन्डे, कविता साखरे तसेच पोलिस स्टेशन काटोल येथील पोलिस उपनिरीक्षक कोलते, पोलिस हवालदार लखन महाजन पोलिस नायक प्रविण पवार
पोलीस शिपाई गुलाब भालसागर, गौरव यखाल, भुषन पलेरिया, रमेश काकड, दत्तात्रय दिन्डे यांनी पार पाडली.


