नागपुर ग्रामीण LCB ने कुही पोलिस स्टेशन हद्दीत असलेल्या रिसॅार्टवर केली मोठी कार्यवाही…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

नागपुर- आगामी सणउत्सवाच्या पार्श्व भुमीवर पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी सर्व  प्रकारच्या अवैध गोष्टीवर आळा बसविण्याबाबतीत सुचना व आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे व त्यांच्या चमुला दिले त्या अनुषंगाने दिनांक ०१/१०/२०२३ ते दिनांक ०२ / १० / २०२३ रोजी मध्यरात्री दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरेड उपविभागात पेट्रोलिंग करीत असता गोपनीय महिती मिळाल्यावरून उमरेड उपविभागातील पोलिस स्टेशन कुही  हद्दीतील दुरक्षेत्र पाचगाव हद्दीतील मौजा पाचगाव येथील सिल्व्हरी लेक फार्म रिसॉर्टचे डोरमेट्री हॉल येथे साऊंड सिस्टीमवर अश्लील गाणे वाजवून मुलींना तोकडे व कमी कपडे घालून विभस्तपणे चेहरा व हाताचे इशारे करून मुलींना नाचवून व त्यांचेवर पैसे उधळून रिसॉर्ट मालकाकडून अवैद्यरित्या विदेशी दारू पुरविली जात आहे. अशा खात्रीशीर मिळालेल्या माहिती वरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सापळा रचून नमुद घटनास्थळी रेड केली असता रेड दरम्यान काही मुली
अश्लील हाव भाव करून कमी कपडे घालुन नृत्य करतांना व काही पुरूष नृत्य करणाऱ्या मुलींवर पैसे उडवतांना मिळून आल्याने रेड केली असता सदर ठिकाणी १३ महिला व आरोपी

– १) रिसॉर्ट चालविणारा राजबापू मुथईया दुर्गे, रा. नागपूर



२) मॅनेजर विपीन यशवंत आलेने, रा. जगनाडे चौक नागपूर



३) अश्लील नृत्य करिता मुली पुरविणारा
भुपेंद्र उर्फ मॉन्टी सुरेश अणे, रा. रामटेक





४) अभय वेंकटेश सकांडे, रा. वर्धा

५) अतुल ज्ञानेश्वर चापले रा. मोठी आंजी वर्धा

६) शुभम ओमप्रकाश पवणीकर, रा. जुनी मंगळवारी नागपूर

७) विशाल माणिकराव वाणी, रा. जुनोना जि.वर्धा

८) आशिष नथुजी सकांडे रा. गांधी नगर वर्धा

९) हर्षल भाऊराव माळवे, रा. मानस मंदिर वर्धा

१०) विजय सदाशिव मेश्राम, रा. तीगाव जि. वर्धा

११) प्रवीण महादेवराव पाटील, रा. मसाला वर्धा

१२) अशोक तुकाराम चापडे रा. गजानन नगरी सेलू जि. वर्धा

१३) कौसर अली लियाकत अली सईद, रा. केळझर जि. वर्धा

१४) प्रशांत ज्ञानेश्वर घोगडे, रा. जुना पाणी जि. वर्धा

१५) प्रवीण रामभाऊ बिडकर रा. रोठा जि. वर्धा

१६) सतीश उध्दवराव वाटकर, रा. हिंगणी जि. वर्धा

१७) गजानन रामदास घोरे, रा. पिंपळगाव ता. बाळापूर जि. अकोला १८) महेश महादेव मेश्राम, रा.झडशी जि. वर्धा

१९) गोविंद जेठालाल जोतवांनी, रा. साई मंदिर वर्धा

२०) राकेश विठ्ठलराव भांढेकर रा. खापरी वार्ड क्र. २ जि. वर्धा

२१) अविनाश शंकरराव पंधराम रा. बोरखेडी कला जि. वर्धा

२२) आकाश किसनाजी पिंपळे, रा.झडशी जि. वर्धा

२३) राजेश रमेश शर्मा रा. दयाळ नगर अमरावती

२४) संजय सत्तणारायन राठी, रा. प्रताप नगर वर्धा

तसेच विभस्त नृत्य करणारे १३ महिला आरोपी असे एकूण ३७ आरोपी पुरुष व महिला वरीलप्रमाणे कृत्य करीत असतांना मिळुन आले. सदरचे सिल्व्हरी लेक फार्म रिसॉर्ट हे अभ्यंकर नगर नागपुर येथे राहणाऱ्या दोन महीलांच्या मालकीची असुन राजबापू मुथईया दुर्गे, रा. नागपूर याने किरायाने घेतले होते. यामध्ये  सामील १३ महिला आरोपी विरुद्ध पोलिस स्टेशन कुही येथे विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे. आरोपीतांकडुन

१) २ विदेशी दारूचे बॉटल ७५० ml एकूण २३४०/- रू.

२) १ विदेशी दारूची २००० ml ची बॉटल किंमती ३८४०/- रुपये ३) दोन ब्लू टूथ स्पीकर ३५०००/- रू.

४) २ डिस्को लाईट किंमती १००००/- रू.

५) १ माईक किंमती २००० / – रू.

६) महिंद्रा झायलो किंमती १०,००,००० /- रू.

७) महिंद्रा स्कॉर्पिओ किंमती १२,००,००० /- रू.

८) महिंद्रा बोलेरो निओ किंमती ८,००,००० /- रू.

९) स्विफ्ट डिझार किंमती ५,००,०००/– रु.

१०) मारुती एस क्रॉस किंमती १२,००,००० /- रू.

११) रोख रक्कम १,१२,७००/- रु.

असा एकूण ४८,४८,८८०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त मुद्देमाल व कागदपत्रे पुढील कायदेशीर प्रक्रियेकरीता पोलिस ठाणे कुही दुरक्षेत्र पाचगाव यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक नागपुर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भा.पो.से) तसेच अपर पोलिस अधीक्षक डॉ. श्री. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, आशिषसिंग ठाकूर, पोलिस उपनिरीक्षक आशिष मोरखडे, बट्टूलाल पांडे,
सहायक फौजदार चंद्रशेखर गाडेकर, ज्ञानेश्वर राऊत, पोलिस हवालदार गजेंद्र चौधरी, अरविंद भगत, मयूर ढेकले, दिनेश अधापुरे, विनोद काळे, आशिष भुरे, प्रमोद भोयर, इक्बाल शेख, महिला पोलिस हवालदार कविता बचले पोलिस नायक अमृत किनगे, रोहन डाखोरे, संजय भदोरीया, महिला पोलिस नायक वनिता शेंडे, पोलिस अंमलदार राकेश तालेवार चालक पोलिस नायक शुक्ला, चालक पोलिस हवालदार अमोल कुथे, चालक पोलिस अंमलदार
सुमित बांगडे, आशुतोष लांजेवार, तसेच पोलिस स्टेशन कुहीचे पोलिस उपनिरीक्षक सोनकुसरे व त्यांचा स्टाफ यांनी पार पाडली. पुढील तपास पोलिस निरीक्षक महेश भोरटेकर पोस्टे कुही हे करीत आहेत.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!