
विनापरवाना अवैधरित्या वाळुची वाहतुक करणारे रामटेक पोलीसांचे ताब्यात…
विनापरवाना अवैधरीत्या वाळुची वाहतुक करणाऱ्या आरोपींना चारचाकी वाहनांसह केली अटक..,
रामटेक(नागपुर ग्रामीण)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की,
दि ०६.०१.२३रोजी १०.३० वा दरम्यान मुखबीरदवारे माहीती मिळाली कि एक पांढ-या रंगाचे दोन टिप्पर मध्ये तुमसर रोडने अवैधरित्या विनापरवाना रेतीची वाहतुक होत आहे अश्या मिळालेल्या विश्वसनिय माहीतीवरून एच पी पेट्रोल पंप रामटेक जवळ खाजगी वाहनाने उभे असता तुमसर रोडने दोन टिप्पर एकामागे एक येतांना दिसल्याने दोन्ही टिप्पर थांबवुन सदर दोन्ही टिप्परची पाहणी केली असता


१) टिप्पर क्रमांक एच ४० एके ५१३५ चे चालकाने त्याचे नाव- कृष्णा गणेश शिंदे मेश्राम वय २६ वर्ष रा शिवाजी नगर कन्हान ता पारशिवनी जि नागपूर

२. टिप्पर क्रमांक एम एच ४० बिएल ६४०२ चे चालकाने त नाव – हरीदास सहादेव दुदुके वय ३२ वर्ष रा वारेगाव ता कामठी जि नागपूर

असे सांगितले. त्यांनतर फिर्यादीने त्यास वाहनाच्या मागील डाल्यात असलेल्या वाळु वाहतुकीबाबत परवाना विचारला असता परवाना नसल्याचे सांगितल्याने सदर टिप्पर चालकाचे ताब्यातुन १० चक्का टिप्परचा क्र एम एच ४० एके ५१३५ कि २०,००,००० /- व ५ ब्रास
रेती कि १५०००/- रू. असा एकुण २०१५०००/- २) १० चक्का टिप्पर चा क्र एम एच ४० बी एल ६४०२ कि २०,००,००० / – रू. व ५ ब्रास रेती कि १५०००/- रू असा एकुण २०१५०००/- रू असा
एकुण ४०,३०,०००/–रू चा माल जप्त करून पोलिस स्टेशन रामटेक येथे आणुन पोलिस स्टेशन ला नमुद आरोपीविरूध्द कलम ३७९,१०९ भादवि सहकलम ४८ (८) महाराष्ट्र जमीन महसुल अधिनीयम अन्वयें गुन्हा नोंद केला
.सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार,अपर पोलिस अधिक्षक डॅा संदीप पखाले,सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी रामटेक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक ह्रुदयनारायन यादव, पोलिस
उपनिरीक्षक श्रीकांत लांजेवार, पोहवा अमोल इंगोले, नापोशि मंगेश सोनटक्के, प्रफुल रंधई, पोशि शदर गिते,धिरज खंते यांचे पथकाने पार पाडली.
.


