
सावनेर पोलिस स्टेशन हद्दीत SDPO यांचे पथकाचा हुक्का पार्टीवर छापा..…
सावनेर पोलिसांची टाकळी- भन्साळी शिवारात विराट फार्म हाउसमधील हुक्का पार्टीवर छापा ३ आरोपी अटकेत…
सावनेर(नागपुर ग्रामीण) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की,नागपुर ग्रामीण पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांचे आदेशाने जिल्ह्यात विशेष
मोहीम राबविली जात होती. त्या अनुषंगाने सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,सावनेर अनील मस्के यांना गोपनीय माहीती मिळाली की सावनेर- नागपूर महामार्गावरील टाकळी (भन्साळी) शिवारातील विराट फार्म हाऊसमध्ये हुक्का पार्टी सुरु आहे सुरु असलेल्या हुक्का पार्टीवर पथकाने सोमवारी (दि. १)मध्यरात्री धाड टाकली. यात तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून हुक्का पॉट व इतर साहित्य जप्त करण्यात आले.


पीयूष सुरेश वाकोडीकर (३०, रा.सोनेगाव-खामला, नागपूर

शुभम सुरेश आमदरे (३०, रा. छत्रपती नगर, नागपूर)
अजय भगवानप्रसाद तिवारी (४२, रा.छावणी, नागपूर)

अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
नागपूर ग्रामीण पोलिसांनी नवीन वर्षानिमित्त अवैध दारूविक्री तसेच ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह विरोधात कारवाईची करण्याच्या राष्ट्रीय व राज्य
महामार्गालगतचे हॉटेल, रिसॉर्ट आणि फार्ममध्ये चालणाऱ्या पाट्यांवर नजर ठेवली होती. दरम्यान, सावनेर तालुक्यातील टाकळी (भन्साळी) शिवारात असलेल्या विराट फार्म हाऊसमध्ये सोमवारी मध्यरात्री हुक्का पार्टी सुरू असल्याची माहिती सावनेर
पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांच्या पथकाने मध्यरात्री २.५५ वा चे सुमारास त्या फार्म हाऊसची प्रत्यक्ष पाहणी केली. यात त्यांना पीयूष व शुभम हुक्का ओढत बसले असल्याचे आढळून आले. त्यांना हुक्का व इतर साहित्य फार्म हाऊसचा मालक अजय
तिवारी याने पुरविल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी लगेच तिघांनाही ताब्यात घेऊन अटक करण्यात आली
त्यांच्याकडून हुक्का पॉट व हुक्क्यासाठी लागणारे विविध साहित्य असा अंदाजे तीन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
या तिन्ही आरोपींची न्यायालयाने जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
याप्रकरणी सावनेर पोलिसांनी भादंवि १८८ तसेच सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायदा (कोप्ता), २००३ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
सदरची कारवाई सहाय्यक पोलिस अधिक्षक/उपविभागिय विभागीय पोलिस अधिकारी अनिल मस्के यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी नागवे व सहायक पोलिस निरीक्षक शरद भस्मे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.


