भाग्यनगर नांदेड पोलिसांनी घरफोडीचे २ गुन्हे उघड करुन मुद्देमाल केला हस्तगत…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

भाग्यनगर, नांदेड पोलिसांनी संशईत सराईत आरोपीस ताब्यात घेऊन हदीतील  02 घरफोडी उघड केल्या त्यांचे कडुन 111 ग्रॅम सोने व इतर साहीत्य असा एकुण 5,40,000/-रु मुद्देमाल केला जप्त……

नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड शहरात दिवसेदिवस वाढत असलेल्या घरफोडीचे व चोरीचे घटनेत वाढ होत असल्याने सदरील गुन्हयावर प्रतिबंध व गुन्हे उघड करणेबाबत पोलिस अधिक्षक  श्रीकृष्ण कोकाटे,अपर पोलिस अधिक्षक,नांदेड यांनी शहरातील सर्व पोलिस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते.





त्याअनुषंगाने पोलिस  निरीक्षक  रमेश वाघ पोलिस स्टेशन भाग्यनगर, नांदेड व प्रभारी रामदास शेंडगे पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन भाग्यनगर, नांदेड यांनी पोलिस स्टेशनचे गुन्हे शोध पथकास मार्गदर्शन करुन घरफोडी व चोरीचे गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेवून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत वेळोवेळी सुचना व मार्गदर्शन केले होते



त्यानुसार दिनांक 13.05.2024 रोजी पोलिस स्टेशन भाग्यनगर, नांदेड येथील गुन्हे शोध पथक हे पेट्रोलींग करीत असतांना पो.उप नि. विनोद भा. देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, त्यांचे कडील गुन्हा क्रमांक 82/ 2024 कलम 454,457, 380 भा. दं. वि. मधील आरोपी हे वसमत जि. हिंगोली येथील असुन ते सध्या मालेगाव ता. अर्धापुर जि. नांदेड येथील चौकामध्ये आहेत. तसेच त्यातील एक इसम हा शिख धर्माचा आहे अशी माहीती मिळाल्यात्यावरुन पो.उपनि. देशमुख व त्यांचेकडील गुन्हे शोध पथकातील अमंलदार पोहवा प्रदिप गर्दनमारे, गजानन किडे, दिलीप राठोड, पोशि ओमप्रकाश कवडे, हनवता कदम व सतिष कदम असे मालेगाव ता. अर्धापुर जि. नांदेड येथे जावुन तेथुन आरोपी 1) रमेश सुरेश गायकवाड वय 34 वर्षे व्यवसाय मजुरी रा. गणेशपुर वसमत जि. हिंगोली. 2) सतनामसिंग पिता गुरुमुखसिंग चव्हाण वय 30 वर्षे व्यवसाय व्यापार रा. नवामोंढा वसमत जि.हिंगोली यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता सदर आरोपींनी त्यांचा एक साथीदार संतराम ऊर्फे पिंटया रघुनाथ सरोदे रा. तलाब गल्ली अर्धापुर याचे मदतीने पोलीस स्टेशन भाग्यनगर, गु.र.नं. 82/2024 कलम 454,457,380 भा.दं.वि. व गु.र.नं. 138/2024 कलम 454,457, 380 भा. दं. वि. हे दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली असुन वरील 02 घरफोडीच्या गुन्हयातील एकुण 111 ग्रॅम सोने व इतर मुदेमाल असा एकुण 5,40,000/- रु चा मुद्देमाल जप्त केला व गुन्हा उघडकिस आणला



सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे,अपर पोलिस अधिक्षक, नांदेड, अविनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक,भोकर, डॅा खंडेराव दरणे, सहायक पोलिस अधिक्षक,उपविभाग,नांदेड शहर,क्रितीका सी एम, पोलिस निरीक्षक  रमेश वाघ व प्रभारी पोलिस निरीक्षक रामदास शेंडगे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अधिकारी पो.उप नि.विनोद भा. देशमुख व पोहवा
दिलीप राठोड, गजानन किडे, प्रदिप गर्दनमारे,पोशि ओमप्रकाश कवडे, हनवता कदम,सतिष कदम पोलिस स्टेशन भाग्यनगर नांदेड व सायबर सेल येथील पोहवा राजेंद्र सिटीकर यांनी पार पाडली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!