ट्रक चालकास लुटून त्याचा खुन करणार्यास नांदेड पोलिसांनी केले जेरबंद…
नांदेड(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस ठाणे नांदेड ग्रामीण हद्दीमधे मारताळा शिवारातील पेट्रोलपंपसमोर बाहेर राज्यातील ट्रक चालकाकडील रोख रक्कम जबरीने चोरी करुन त्याचा अज्ञात आरोपीतांनी खंजरने खुन केला होता. त्यावरुन
पोलिस ठाणे नांदेड ग्रामीण गुरनं. 362/2022 कलम 302, 394, 34 भा.द.वि सहकलम 4/25 4/27 शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमुद गुन्हयातील एक आरोपी अटक करण्यात आला होता.
नमुद गुन्हयातील इतर आरोपी फरार असल्याने त्याचा शोध घेवुन अटक करण्याबाबत श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस अधीक्षक, नांदेड यांनी पोलिस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन आरोपीचा शोध घेणे चालु केले होते. चे दिनांक 22/11/2023 रोजी स्थागूशा चे पथकास गूप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, नमुद गुन्हा करणारा आरोपी हा मौजे बारुळ ता कंधार जि. नांदेड येथे असल्याबाबत माहीती मिळालेने त्यांनी तशी माहीती वरीष्ठांना देवुन स्थागुशा चे पथकाने सापळा रचुन आरोपी
दयानंद आनंदा भोसले वय 21 वर्ष व्यवसाय बेकार राहणार- बारुळ ता. कंधार जि नांदेड
यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. नमुद आरोपीस पोलिस ठाणे नांदेड ग्रामीण येथे गुन्हयाचे तपासकामी देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस अधीक्षक, नांदेड,अबिनाश कुमार अपर पोलिस अधीक्षक, नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलिस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली,
उदय खंडेराय, पो. नि. स्थागूशा नांदेड, सपोनि पांडुरंग माने, सफौ माधव केंद्रे, पोहवा गुंडेराव करले, पोनादेवा चव्हाण, रणधीर राजबन्सी, मारोती मोरे, चालक पोशि गंगाधर घुगे स्थागुशा, नांदेड यांनी पार पाडली सदर पथकाचे पोलिस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.