
अट्टल सोनसाखळी चोरट्यांना नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…
नांदेड( प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की चोरी केलेल्या बुलेटवरून महिलांच्या गळ्यातील गंठण सोनसाखळी हिसकावयाचे आणि पोलिसांना संशय येऊ नये म्हणून चोरटे वेगवेगळ्या वाहनांचा वापर करायचे. पोलिसांनी मात्र चोरट्यांच्या पायातील बुटावरून दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. नांदेड पोलिसांनी त्यांच्याकडून गंठण आणि दोन बुलेट जप्त केल्या आहे. सलमानखान असलम खान आणि तौफिक खान आयुब खान असं अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी महिलेच्या गळ्यातील गंठण पळवल्याची घटना घडली होती. ऐन दिवाळी सणा दरम्यान, सलग दोन दिवस आणि चैन स्नॅचिंगची घटना घडल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठांच्या सूचनेवरून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस निरीक्षक सुर्यमोहन बोलमवाड यांनी आठ पथकं तयार केली होती यासर्व टिम साध्या गणवेशात सातत्याने पेट्रोलिंग करत होत्या. ज्या मार्गावर घटना घडली, त्या मार्गावरील सीसीटीव्ही बारकाईने तपासण्यात आल्या. यावेळी चोरट्यांच्या पायातील बुटावरून पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान त्यांना ताब्यात घेतले.त्याची चौकशी केली असता, त्यांनी भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळे सहा गुन्हे केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या चोरीच्या दोन बुलेट आणि गंठण असा एकुन ४ लाख ५० हजार रूपयाचा मुद्देमाल पोलिसानी जप्त केला आहे.
सदरची कामगीरी सदरची कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक नांदेड अबिनाश कुमार,अप्पर पोलिस अधिक्षक डॅा खंडेराव दरणे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज गुरव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलिस निरिक्षक सुर्यमोहन बोलमवाड, पोलिस उपनिरिक्षक सुनिल भिसे, पोहवा दिलीप राठोड, गजानन किडे, प्रदीप गर्दनमारे, कळके, पोशि हणमंता कदम, ओमप्रकाश कवडे, यांनी केलेली आहे.


सध्या दिवाळी सणाचा उत्सव आहे. दरम्यान, सोन्याची खरेदी-विक्री जास्त प्रमाणात असते. याप्रसंगात ओडिसा आणि केरळ या राज्यातून गुन्हेगारी टोळ्या नांदेडमध्ये कार्यरत होतात. सराफा व्यापाऱ्यांच्या दररोजच्या वागण्याची रेकी करतांना त्यांच्याच दुकानासमोर काही तरी छोटी-मोठी वस्तु विक्रीची दुकान लावतात आणि सोने व्यापाऱ्याची रेकी पूर्ण झाल्यावर त्याच्या ऐवजावर डल्ला मारतात. गुन्हेगार तोंड लपवून तोंडाला रुमाल बांधून
संशयितरित्या फिरतात. त्यामुळे शहरात तोंड बांधून फिरणाऱ्या पुरुषांवर आम्ही आता कारवाई करणार, असा इशारा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.



