
कुख्यात गुंड मोक्कातील फरार आरोपीस गुंडा विरोधी पथकाने पुणे येथुन घेतले ताब्यात…
उपनगर हद्दीतील गोळीबारातील गुन्हेगारी गँगचा शुटर व मोक्का मधील फरार आरोपी“बारक्या” ला गुंडा विरोधी पथकाने पुण्यातुन ठोकल्या बेडया….
नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१) फेब्रुवारी रोजी उपनगर पोलिस ठाणे हद्दीत तक्रारदार बर्खा उज्जैनवाल यांचे तक्रारीवरुन मयुर बेद, संजय बेद, टक्कु उर्फ सनी पगारे, बारक्या उर्फ श्रीकांत वाकुडे, इर्शाद चौधरी, दिपक चाटया व गौरव गांडले यांनी त्यांचा मुलगा राहुल उज्जैनवाल याचे सोबत झालेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांचे घरी पिस्तुल व कोयते घेवुन आले व राहुल उज्जैनवाल याचे विषयी विचारपुस करून शिवीगाळ केली व तक्रारदार यांचेवर जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने पिस्तुल रोखुन दोन गोळया झाडल्या नंतर लोकांची गर्दी जमा झाल्याने सर्व आरोपी तिथुन पळुन गेले त्यावरुन उपनगर पोलिस ठाणे येथे गुन्हा रजि. नंबर ३५ / २०२४ भादंविक ३०७, १४३, १४७, १४९, ५०४,५०६, १२० (ब), भा.ह.का.क. ३ / २५, ४/२५ सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३(१)(ii),३(२),३(४) प्रमाणे गुन्हा दिनांक ०२/०२/२०२४ रोजी दाखल केला होता
सदर गंभीर स्वरुपाच्या गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्याकरिता पोलिस आयुक्त संदीप कर्णीक, पोलीस उपायुक्त,गुन्हे
प्रशांत बच्छाव, सहा पोलिस आयुक्त (गुन्हे), डॉ. सिताराम कोल्हे, यांनी गुंडा विरोधी पथकांना आदेशीत केले होते.सदर गुन्हयातील आरोपी बारक्या उर्फ श्रीकांत वाकुडे हा गुन्हा घडल्यापासुन स्वत:ची ओळख लपवुन राज्य गोवा,मुंबई, उज्जैन, शिर्डी, पुणे येथे पळुन गेला होता. त्याअनुषंगाने गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी सपोनि ज्ञानेश्वर मोहिते व पथकातील पोलिस शिपाई विजय सुर्यवंशी,प्रदिप ठाकरे यांनी सदर गुन्हयातील सराईत गुन्हेगाराचा कोणताही सुगावा नसतांना तांत्रिक व मानवी कौशल्य वापरुन आरोपी हा सध्या हडपसर व लोणीकंद, जिल्हा पुणे या परिसरात असल्याची
माहिती मिळाल्यावरुन दिनांक २७/०४/२०२४ रोजी गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी सपोनि / ज्ञानेश्वर मोहिते व पथकातील पोलिस अंमलदार विजय सुर्यवंशी, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, प्रविण चव्हाण हे हडपसर व लोणीकंद, जिल्हा पुणे याठिकाणी जावुन सदर परिसरामध्ये दोन दिवस आपली स्वतःची ओळख न दाखविता वेशांतर करुन सदर परिसरामधील स्थानिक गुन्हेगारांची माहिती काढुन त्यांचेकडे नाशिक येथील फरार आहे किंवा नाही याची माहिती घेतली असता गुन्हयातील आरोपी बारक्या उर्फ श्रीकांत माणिक वाकुडे वय – ३४ वर्षे रा. जेतवन नगर, उपनगर, नाशिक हा लोणीकंद जिल्हा पुणे या परिसरामध्ये असले बाबत माहिती मिळाल्याने आरोपीचा कोणताही ठावठिकाणा नसतांना पुर्ण लोणीकंद परिसरातील झोपडपट्टी व हॉटेल परिसरातील लोकांकडे चौकशी केली असता आरोपी हा फिरस्ता असुन सायंकाळच्या वेळी खाण्यापिण्यासाठी परिसरात येत असल्याची माहिती मिळाली.


त्यावरुन दिनांक २८/०४/२०२४ रोजी सायंकाळच्या वेळी पोलिस पथकाने कटकेवाडी, लोणीकंद परिसरातील हॉटेल असलेल्या ठिकाणी सापळा लावला असता आरोपी व्यसनासाठी हॉटेल जवळ येत असतांना त्यास आजुबाजुला पोलिस असल्याची चाहुल लागताच पळुन जाण्याच्या प्रयत्नात असतांना आरोपी बारक्या उर्फ श्रीकांत माणिक वाकुडे याचा पाठलाग करुन शिताफीने ताब्यात घेऊन त्यास नाशिक येथे आणुन पुढील तपासकामी सहा.पोलिस आयुक्त, नाशिकरोड विभाग,डॅा सचिन बारी यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदिप कर्णीक,पोलिस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव,सहा पोलीस आयुक्त (गुन्हे),डॉ. सिताराम कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलिस शिपाई विजय सुर्यवंशी, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, प्रविण चव्हाण, प्रदिप ठाकरे, डी. के. पवार, राजेश सावकार, सुनिल आडके, नितीन गौतम, गणेश नागरे, निवृत्ती माळी,सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे.



