कर्नाटक येथुन दर्शनासाठी आलेल्या भाविक महीलेची सोन्याची माळ हिसकवणारे पोलिसांचे ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

नाशिक शहरामध्ये दिवसाढवळ्या सोनसाखळी चोरीच्या घटना सुरूच आहेत. यात कर्नाटकाहून देवदर्शनासाठी आलेल्या महिला भाविकांच्या गळ्यातील सोन्याची माळ लांबविल्याची घटना घडली होती. मात्र पोलिसांनी  तपासाची चक्र तात्काळ फिरवत आरोपीला ताब्यात घेतले आहे….

नाशिक(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,कर्नाटक राज्यातून काही भाविक खास नाशिक दर्शन करण्यासाठी आले होते. यावेळी द्वारका परिसरात हे भाविक बसमधून साहित्य घेण्यासाठी खाली उतरले असता अमृतांच्यावेळी कामगारनगर परिसरातील दोघांनी एका दुचाकीवर येत महिलेच्या गळ्यातील पोत तोडून फरार झाले
होते. या घटनेचा पोलिसांनी तपास  लावला असून दोन चेन चोरणाऱ्या संशयितांनी  पोलिसांनी ताब्यात घेतले असून हे दोघेही नाशिकच्या विडी कामगारनगरमध्ये राहणारे आहेत.





ओमकार उर्फ दीपक वसंत शिंदे आणि रोशन कटारे अशी दोघांची नावे असून या दोघांनाही पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून एका दुचाकीस ताब्यात घेतले आहे. भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेले एकूण ३ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या चैन चोरट्यांकडून तब्बल ४६ ग्रॅम सोनं पोलिसांनी हस्तगत केले आहे. पुढील तपास भद्रकाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सत्यवान पवार व त्यांचा पथक करत आहेत.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!