नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ ने काही तासात पंडींत कॅालनी येथील खुनाचा केला उलगडा….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

पंडीत कॉलनीतील खुनाच्या आरोपीस गुन्हे शाखा युनीट १ ने  ०९ तासाच्या आत केले जेरबंद….

नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, सरकारवाडा पोलिस ठाणे येथे गुरनं २४५/२०२४ भा. न्या. सं. कलम १०९ (१), ६१(२), ३५१ (२), ३५१(३), ३ (५), भा. ह. का कलम ४/२५, म.पो.का कलम १३५ प्रमाणे दिनांक ०१/१०/२०२४ रोजी दाखल झाला होता.सदरचा गुन्हा शहराच्या मध्यवर्ती भागात म्हनजेच पंडीत कॉलनीत घडला असल्याने तो त्वरीत उघडकीस यावा यासाठी पोलिस आयुक्त  संदिप कर्णिक यांनी गुन्हे शाखेस आदेशीत केले होते



.त्या अनुषगांने पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा पोलिस आयुक्त (गुन्हे शाखा) संदिप मिटके यांनी घटनास्थळी भेट देवुन मार्गदर्शन केले होते त्यानुसार गुन्हे शाखा युनीट १ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्रमांक १ चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवुन गुन्हयाचा समांतर तपास सुरू केला असता तपासा दरम्यान पोहवा  विशाल काठे व संदिप भांड यांना मिळालेल्या गोपनीय बातमी वरून सदर गुन्हयातील पाहिजे आरोपी अथर्व दाते, अभय तरे व रितेश साळुंखे हे पेठ भागात गेले आहेत बाबत माहीती मिळाली



त्यानुसार वपोनि मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्रमांक १, नाशिक शहर चे सपोनि  हेमंत तोडकर, पोउनि  रविंद्र बागुल, पोहवा  विशाल काठे, संदिप भांड, प्रशांत मरकड, विशाल देवरे या पथकाने पेठ परिसरात जावुन पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेतला असता  १) अथर्व अजय दाते, वय-२० वर्षे, रा-घारपुरे घाट अशोकस्तंभ नाशिक, २) अभय विजय तुरे, वय १९ वर्षे, रा हेमलता टॉकीज रविवारपेठ नाशिक, व ३) बालक अशी सांगितली. त्यांना सदर खुनाच्या गुन्हया बाबत विचारपुस करता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपींना पुढील कारवाई कामी सरकारवाडा पोलिस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.





यातील आरोपी अथर्व अजय दाते हा रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरोधात १) सरकारवाडा पो. स्टे । गुरनं १७०/२०२१ भा.द.वि कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे २) सरकारवाडा पो. स्टे । गुरनं ३२१/२०२३ भा.द.वि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे ३) पंचवटी पो. स्टे । गुरनं ३०१/२०२४ भा.द.वि कलम ३२६,४५२, ५०४, ३४ प्रमाणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक,पोलिस उप-आयुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव,सहा. पोलिस आयुक्त(गुन्हे शाखा) संदिप मिटके, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्र. १ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक. मधुकर कड, सपोनि हेमंत तोडकर, पोउनि रविंद्र बागुल, पोहवा विशाल काठे, संदिप भांड, प्रशांत मरकड, विशाल देवरे, शरद सोनवणे, जगेश्वर बोरसे, प्रदिप म्हसदे, रविंद्र आढाव, नाझीम पठाण, धनंजय शिंन्दे, महेश साळुंके, योगीराज गायकवाड, नितीन जगताप, विलास चारोरकर, रमेश कोळी, राजेश लोखंडे, समाधान पवार, मनिषा सरोदे यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!