
लिफ्टच्या बहाण्याने लुटणारे गुंडा विरोधी पथकाने केले जेरबंद…
लिफ्ट घेण्याचे बहाण्याने गंभीर दुखापत करुन जबरी चोरी करणाऱ्या दोन अज्ञात आरोपींना ताब्यात घेवुन गुंडा विरोधी पथकाने केली गुन्हयाची उकल…


नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (१६) ॲागस्ट २०२४ रोजी रात्री १०:३० वाजेचे सुमारास यातील फिर्यादी अँथोनि गैब्रियल साळवे वय ६५ वर्षे रा. बिशप हाउसचे मागे, जेलरोड, नाशिक हे सेंट अण्णा हाउस येथील चर्च मधुन त्यांचे अॅक्टीवा गाडीवरुन घरी जात असतांना एका अज्ञात इसमाने त्यांचेकडे लिफ्ट मागितली फिर्यादी यांनी लिफ्ट दिल्याने पुढे क्रोमा शोरुम जवळ, बोधले नगर सिग्नल नाशिक येथे गाडी थांबवुन त्याने त्याचे मित्रास बोलावले व दोघांनी मिळुन फिर्यादी यास दगडाने मारहान केली व फिर्यादी यांची १ तोळयाची सोन्याची अंगठी, १० ग्रॅम वजनाची चांदीची अंगठी, मोबाईल फोन, अॅक्टीवा गाडी एम.एच.१५ ई.एम.६३३१ तसेच एसबीआय बँकेचे २ ए.टी.ए. कार्ड असा एकुण ५३,०००/- रूपयाचा मुद्देमाल बळजबरीने फिर्यादी यांचे ताब्यातुन घेवुन पळून गेले यावरुन दिनांक १७/०८/२०२४ रोजी उपनगर पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर २७८/२०२४ भान्यासंक ३०९ (६), ३ (५) प्रमाणे दोन अज्ञात आरोपर्पीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता

सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असुन गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेण्याकरिता पोलिस आयुक्त संदीप कर्णीक यांनी गुंडा विरोधी पथकास आदेशीत केले होते त्यानुसार पोलिस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, सहा पोलिस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली समांतर तपास सुरु केला होता त्याप्रमाणे गुंडा विरोधी पथकतील पोलिस अंमलदार राजेश राठोड यांना माहिती मिळाली की, दि. १६ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री भाजीपाला मार्केट यार्ड पंचवटी परिसरात लाल रंगाच्या अॅक्टीवा गाडीवर मार्केट यार्ड येथे हमाली करणारे अभि व अनिल नावाचे इसम रात्री संशयीतरित्या फिरत होते व त्यांचेकडे असलेल्या लाल रंगाच्या अॅक्टीवा गाडीवरच ते रात्रीच औरंगाबाद येथे गेले तसेच दि.२०/०८/२०२४ रोजी रात्री नाशिक येथे येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी सहा. पोलिस निरीक्षक, ज्ञानेश्वर मोहिते यांनी पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहा पोलिस आयुक्त (गुन्हे), संदीप मिटके यांना माहिती देवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे दोन पथके तयार करून एक पथक भाजीपाला मार्केट पंचवटी व दुसरे पथक नाशिकरोड रेल्वे स्टेशन येथे रवाना केले.

त्यानुसार दि. २१/०८/२०२४ रोजी पहाटे गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी व पोलिस अंमलदार राजेश राठोड, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत यांनी नाशिकरोड रेल्वे स्टेशन येथे सापळा लावला असता १) अनिल गौतम इंगळे वय-२२ वर्षे रा. भाजीपाला मार्केटच्या गाळयामध्ये पंचवटी नाशिक मुळ रा. सिल्लोड, जि. औरंगाबाद २) अभिषेक सुनिल चौघुले वय २४ वर्षे रा. अवधुतवाडी, दिंडोरी रोड, पंचवटी, नाशिक यांना नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसरातुन शिताफीने ताब्यात घेवुन त्यांच्याकडे गुन्हयासंदर्भात चौकशी केली असता त्यांना मौजमजा करण्यासाठी पैशाची गरज असल्याने त्यांनी फिर्यादी यांना मारहान करून त्यांची गाडी व मुद्येमाल घेवुन सिल्लोड जि. औरंगाबाद येथे पळून गेले व गुन्हयातील मुद्देमाल सिल्लोड जि. औरंगाबाद येथे असले बाबत माहिती देवुन त्यांनी गुन्हयाची कबुली दिल्याने त्यांना पुढील तपासकामी उपनगर पोलिस स्टेशन, नाशिक शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णीक, पोलिस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव,सहा पोलिस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, विजय सुर्यवंशी, सुनिल आडके, प्रदिप ठाकरे, राजेश राठोड, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, प्रविण चव्हाण, अशोक आघाव, निवृत्ती माळी, सुवर्णा गायकवाड यांनी केली


