
नाशिक रोड येथील खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीस युनीट १ ने १२ तासाचे आत घेतले ताब्यात…
नाशिकरोड येथील खुनाचे गुन्ह्याचा गुन्हे शाखा युनीट १ ने १२ तासाचे आत मुख्य आरोपीस ताब्यात घेऊन केला उलगडा….


नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, नाशिकरोड पोलिस ठाणे हद्दीत दिनांक ०२/०८/२०२४ फिर्यादी ऋतिक रमेश पगारे, वय-२४वर्षे, रा-लाला का ढाबा शेजारी, किरणनगर, चेहडीशिव नाशिकरोड, नाशिक यांनी फिर्याद दिली की, त्याचा आतेभाऊ प्रमोद केरूजी वाघ (मयत) वय ४० वर्षे यास यश टायर्स समोर असतांना योगेश पगारे व सद्दाम मलिक यांनी त्यांच्याशी वाद करून सद्दाम मलिक याने टायर दुकानातील ब्रेक लॉकची लोखंडी सडई घेवुन प्रमोद वाघ यास जीवे ठार मारण्याचे उद्देशाने डोक्यात मारून गंभीर जखमी केले होते. त्यावरून फिर्यादी यांनी नाशिकरोड पोलिस ठाणे येथे गुरनं ४१० / २०२४ भारतीय न्याय संहिता कलम १०९, ३(५) प्रमाणे तक्रार दिली होती. त्यानंतर उपचार दरम्यान प्रमोद वाघ यांचा मृत्यू झाल्याने भा. न्या. सं. कलम १०३ (१) प्रमाणे वाढीव कलम लावण्यात आले आहे.

सदर गुन्हयाचे अनुषंगाने पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा पोलिस आयुक्त, गुन्हे, संदिप मिटके यांनी घटनास्थळी भेट देवुन गुन्हयातील आरोपींचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत नाशिकरोड पोलिस ठाणे व गुन्हे शाखेचे पोलिस पथक यांना सुचना देवुन मार्गदर्शन केले होते.त्याअनुषंगाने गुन्हे शाखा युनिट १ वरीष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी त्यांचे अधिनस्त असलेले पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्हयाच्या घटनास्थळास तात्काळ भेट देवुन सी.सी.टी.व्ही फुटेजची पाहणी केली सदर गुन्हयातील मुख्य आरोपी सद्दाम मलिक याचा तांत्रिक विश्लेषणाचे आधारे शोध घेत असतांना पोहवा विशाल काठे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील पाहिजे आरोपी सद्दाम मलिक हा वडाळागाव भागातच येणार आहे

अशा खात्रीशीर बातमीवरुन सदरची बातमी वपोनि मधुकर कड यांना दिली असता त्यांनी सपोनि हेमंत तोडकर, पोउनि रविंद्र बागुल, पोहवा प्रविण वाघमारे,विशाल काठे, प्रशांत मरकड,प्रदिप म्हसदे, संदिप भांड,नाझीमखान पठाण,नापोशि विशाल देवरे, चापोशि समाधान पवार यांचे पथक तयार करून आरोपीचा शोध घेण्याकामी नाशिक शहर परिसरात रवाना केले.नमुद पथकाने वडाळागाव परिसरात सदर आरोपीतांचा अहोरात्र भर पावसात शोध होते. आरोपी हा वेळोवेळी हा त्याचे ठिकाण बदलुन फिरत होता त्याचा प्रत्येक ठिकाणी नमुद पथक मागावर होते. सदर आरोपी हा वेश बदलुन नाशिकरोड, इंदिरानगर, वडाळागाव, मुंबईनाका, नानावली, मुंबईनाका परिसरात फिरत होता. परंतु शेवटी वडाळा गावातील राजवाडा परिसरात असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली त्यावरून नमुद पथकाने त्यास मोठ्या शिताफीने पकडुन त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सद्दाम सलिम मलिक, वय ३३ वर्षे, रा-मंदाकीनी चाळ,
अरांगळे मळा मोहिते हॉटेल समोर, एकलहरारोड नाशिकरोड, नाशिक असे सांगितले. त्यास गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस
केली असता त्याने त्याचा साथीदार योगेश पगारे, रा-चेहडी यांचे मदतीने जुन्या वादाची कुरापत काढुन प्रमोद वाघ यास
जिवेठार मारल्याची कबुली दिली.
त्यावरून सदर आरोपीस अटक करुन गुन्हा उघडकीस आला आहे. तरी आरोपीस पुढील तपासकामी नाशिकरोड पोलिस ठाणे यांचे ताब्यात दिले आहे.तसेच सदर गुन्हयातील मुख्य आरोपी सद्दाम मलिक हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द नाशिकरोड
पोलिस ठाणे येथे गुरनं ६५ / २०१४ भादवि कलम ३६३, ३९४, ५०४, ५०६ प्रमाणे व गुरनं ४१५ / २०२१ म.पो.का कलम १३५ प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव,सहा पोलिस आयुक्त,गुन्हेशाखा, संदिप मिटके, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट १ चे वरीष्ठ पोलिस निरीक्षक. मधुकर कड, सपोनि हेमंत तोडकर, पोउनि रविंद्र बागुल,पोहवा विशाल काठे, प्रविण वाघमारे, प्रशांत मरकड, प्रदिप म्हसदे, संदिप भांड, नाझीमखान पठाण, विशाल देवरे,धनंजय शिंदे, पोशि समाधान पवार, जगेश्वर बोरसे अशांनी केलेली आहे.


