
सराईत सोनसाखळी चोरटे गुन्हे शाखा युनीट १ च्या ताब्यात…
सोनसाखळी चोरी करणारे सराईत आरोपी जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्र. १ ची उल्लेखनिय कामगिरी….
नाशिक(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१) रोजी सकाळी ०७:०० ते ७:१५ वा. च्या सुमारास फिर्यादी भारती पुरुषोत्तम रावत रा. सिरीन मेडोज गंगापुर रोड, नाशिक हया ट्रिलॅन्ड ते हिराबाग गंगापुर रोड परिसरात येथे मॉर्निंग वॉक करीत असतांना अॅक्टीव्हा मोपेड वरील ०२ अनोळखी इसमांनी त्यांचे गळयावर थाप मारून गळयातील १५ ग्रॅम वजनाची सोनची पोत
जबरीने चोरून नेली होती. त्याबाबत गंगापुर पोलिस ठाणे गुरन १०६ / २०२४ भा.द.वि. कलम ३९२, ३४ प्रमाणे दाखल झाला होता.


सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा व सामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणारा असल्याने सदर गुन्हयातील आरोपींचा तात्काळ शोध घेणे बाबत पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णीक यांनी सुचना दिल्या होत्या, त्या अनुषगांने पोलिस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा. पोलिस आयुक्त(गुन्हे) डॉ. सिताराम कोल्हे यांनी गुन्हेशाखेचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केले होते.त्यानुसार वरीष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांचे मार्गदर्शन व सुचना प्रमाणे गुन्हेशाखा युनिट ०१ ची पथके तयार करून तात्काळ घटनास्थळी भेट देवुन त्या भागातील सिसिटिव्ही फुटेज ची पाहणी केली, त्यानंतर तांत्रीक विश्लेषणाचा सखोल अभ्यास करून ०२ आरोपींचा शोध घेत असतांना पोशि मुक्तार शेख, आप्पा पानवळ यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या अनुषंगाने चोपडा लॉन्स येथे सापळा लावुन निळया रंगाच्या अॅक्टीव्हा मोपेड क्रमांक एम.एच.
१५ – जी.एल.०४३५ हिच्यावर बसुन येणारे संशयीत इसम १) योगेश शंकर लोंढे रा. खळवाडी, ता. सिन्नर जि. नाशिक २)दत्तु उत्तम धुमाळ रा. जोशी वाडा, गंगापुर रोड, नाशिक यांना शिताफीने पकडुन ताब्यात घेवुन विचारपुस करता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांचे अधिक विचारपुस करता त्यांनी चोरी केलेली सोन्याची पोत काठे गल्ली येथील सराफास विक्री केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे कडुन १,००,०००/- रूपये किंमतीची १५ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड हस्तगत करण्यात आली आहे.तसेच सदर आरोपींचे ताब्यातुन गुन्हयात वापरलेली अॅक्टीव्हा मोपेड व सोन्याची लगड असा एकुण १,६०,००० /- रू चा मुद्देमाल जप्त केलेला आहे. सदर इसमांना पुढील कारवाई कामी गंगापर पोलिस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उप-आयुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव,सहा. पोलिस आयुक्त(गुन्हे)डॅा. सिताराम कोल्हे, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्र. १ नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, सपोनि हेमंत तोडकर, पोउनि गजानन इंगळे, चेतन श्रीवंत, सफौ सुगन साबरे,पो. हवा. शरद सोनवणे, योगीराज गायकवाड, देवीदास ठाकरे, धनंजय शिन्दे, पोशि विलास चारोस्कर, नितीन जगताप,
मुक्तार निहाल शेख, आप्पा पानवळ, राजेश राठोड, रामा बर्डे, चालक सफौ किरण शिरसाठ यांनी संयुक्त रित्या केलेली आहे.



