अट्टल मोटारसायकल चोरट्यास नाशिक शहर पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातून घेतले ताब्यात,२७ मोटारसायकल केल्या जप्त…
मोटारसायकल चोरट्यास नाशिक पोलिसांनी जळगाव येथुन घेतले ताब्यात; २७ मोटार सायकल जप्त…
नाशिक (शहर प्रतिनिधी) – नाशिक पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर नाशिक शहरातुन मोटार सायकल चोरट्याला शिताफीने अटक करून त्याच्याकडून ११ लाख १७ हजार रु. किमतीच्या मोटार सायकल या जप्त केल्या आहेत. सदर कारवाई मोटार सायकल चोरी शोध पथक आणि पारोळा पोलीस ठाणे यांनी मिळून केली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की,पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात वाहन चोरीचे गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी मोटार सायकल चोरी शोध पथकाची स्थापना करून कारवाई करण्याचे आदेशीत केले होते. नाशिक शहरातुन मोटार सायकली चोरी करून त्या जळगाव जिल्हयात विक्री होत असल्याची गोपनीय माहीती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने आरोपींचा सर्वतोपरी शोध घेऊन कारवाई करणे बाबत पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव यांनी सुचना केल्याने सहा पोलिस आयुक्त(गुन्हे) संदिप मिटके यांनी पोउपनि. मुक्तेश्वर लाड, मंगेश जगझाप, रविंद्र दिघे, भगवान जाधव यांना आरोपीचा शोध घेणे बाबत जळगाव जिल्हयात रवाना केले होते. पथकाने पोलीस ठाणे पारोळा, जि.जळगांव यांच्या मदतीने संयुक्त कारवाई करीत मोटार सायकल चोरी करणारा सराईत गुन्हेगार किशोर संजय चौधरी, (वय ३० वर्षे), रा.कृष्ण मंदिराचे मागे, तरवाडे, ता.पारोळा, जि.जळगांव याची माहीती काढुन त्याचा ता. पारोळा जि.जळगाव येथे शोध घेवुन त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन नाशिक शहरातुन वेगवेगळ्या ठिकाणावरून चोरी केलेल्या एकुण २७ मोटार सायकली जप्त केल्या आहेत. आरोपीने चोरी केलेल्या मोटार सायकली त्याने जळगाव जिल्हयातील शिवरे, तरवाडे, आडगांव व धरणगाव येथील शेतकरी व कामगार लोकांना विक्री केल्या होत्या. या मध्ये नाशिक शहरातील एकुण १४ गुन्हे उघडकीस आले आहेत.
सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा पोलिस आयुक्त (गुन्हे), संदिप मिटके,यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलिस निरीक्षक,मुंबई नाका संतोष नरूटे, पोउनि मुक्तेश्वर लाड, पो.हवा. योगेश देश, दत्तात्रय चकोर, नापोशि मंगेश जगझाप, रविंद्र दिघे, पोशि भगवान जाधव, गणेश वडजे सर्व मोटारसायकल शोध पथक सफौ रोदास सोनार, पोशि. गणेश बोरवाले, समीर शेख, नवनाथ उगले, नमुने मुंबई नाका आणि उपविभागिय पोलिस अधिकारी,सुनील नंदवालकर , वपोनि.सुनील पवार, पोउपनि, राजु जाधव, पोहवा. प्रविण पाटील, पोना. संदिप सातपुते पोअं. गवळी, अभिजित पाटील सर्व नेमणूक पारोळा पोलिस, जि. जळगाव यांनी केली आहे.