जादुटोणा करणार्या भोंदु बाबास पंचवटी गुन्हे शोध पथकाने घेतले ताब्यात..

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

जादूटोणा करणाऱ्या भोंदुबाबाला पंचवटी गुन्हे शोध पथकाने केली अटक…

नाशिक (शहर प्रतिनिधी) – पंचवटी गुन्हे शाखेच्या पथकाने अनिष्ट व अघोरी प्रथा तसेच जादूटोणा करणाऱ्या तसेच मानवी कवट्या गळ्यात टाकून, अघोरी विदया करून लोकांना जादुटोणा, भुतपिशाच्चाचे प्रयोग दाखवून त्यातून अर्थार्जन करणे हा त्याचा व्यवसाय होता. माञ त्याला शिताफीने ताब्यात घेऊन त्याचा या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपाआयुक्त,परी – १  किरणकुमार चव्हाण, सहा पोलीस आयुक्त,पंचवटी विभाग, नितीन जाधव यांचे मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली होती.





या बाबत मिळालेल्या माहितीनूसार (दि.१४जून) रोजी ११:०० वा.चे सुमारास पोहवा. कैलास नारायण शिंदे यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, एरंडवाडी, दत्तमंदिराच्या बाजुला कालिका मातेच्या मंदिरात भोंदुबाबा निलेश राजेंद्र थोरात हा काहीतरी जादुटोणा करण्याकरीता मानवी कवट्या गळ्यात टाकून, अघोरी विद्या करून लोकांना जादुटोणा, भुतपिशाच्चाचे प्रयोग करीत असल्याची बातमी मिळाली. सदरची माहिती पोहवा.शिंदे यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मुधकर कड यांना दिली त्यांनी लागलीच दिवसपाळीचे गुन्हे शोध पथकाचे सपोनि.पडोळकर व सफौ संपत जाधव, पोहवा. अनिल गुंबाडे, दिपक नाईक, नापोशि संदीप मालसाने,पोशि घनश्याम महाले यांना बोलावुन घेवुन, मिळालेली बातमी समजावुन सांगुन, बातमीप्रमाणे खात्री करून कारवाई करणे बाबत पंचवटी पोलिस स्टेशन येथील पथक रवाना केले.सदर गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी १४ जून रोजी ११:२० वा. चे सुमारास एरंडवाडी, दत्तमंदिराजवळील कालीका मंदिर येथे जावुन बातमीप्रमाणे खात्री केली असता, सदर ठिकाणी प्लॅस्टिकच्या मानवी कवट्या असलेली माळ, वाळलेले लिंबु मिळुन आले.



वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मधुकर कड यांनी गुन्हेशोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना सदर इसमाचा शोध घेणे बाबत मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे गुन्हेशोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी १६ जून रोजी सदर इसम नामे निलेश राजेंद्र थोरात (वय ३८ वर्ष), रा.गल्ली नं. ५, एरंडवाडी, पंचवटी, नाशिक याचा शोध घेऊन, पोलीस ठाणेस बोलावुन घेतले. त्यास विश्वासात घेवुन, त्याचेकडे कौशल्यपुर्ण विचारपुस केली असता त्याने कबुली दिली की, ” मी गळ्यात कवट्यांची माळ टाकुन मला अलौकीक शक्ती प्राप्त आहे असे लोकांना भासवुन अनिष्ट व अघोरी प्रथांचा वापर करतो व इतरांना प्रवृत्त करून उत्तेजना देतो तसेच तथाकथित चमत्कांरांचा प्रयोग प्रदर्शित करून चमत्कारांचा प्रसार करून त्याद्वारे आर्थिक प्राप्ती करतो अशी माहिती दिली. त्यानंतर इसम नामे निलेश राजेंद्र थोरात याचे विरूध्द पोहवा. कैलास नारायण शिंदे यांचे तक्रारीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात गु.रजि.नं. ३७०/२०२४ महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध करणे करीता व त्यांचे समुळ उच्चाटन करीता अधिनियम २०१३ चे कलम ३ (२) (१) ख (३) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि विलास पडोळकर हे करीत आहे.



अशा प्रकारे सदरची उल्लेखनिय कामगिरी ही पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपायुक्त परी-१  किरणकुमार चव्हाण, सहा पोलिस आयुक्त पंचवटी विभाग नितीन जाधव,वपोनि. मधुकर कड, पंचवटी पोलिस ठाणे, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि.विलास पडोळकर, सफौ संपत जाधव, पोहवा.अनिल गुंबाडे,दिपक नाईक, नापोशि संदिप मालसाने, कैलास शिंदे, पोशि. घनश्याम महाले यांनी पार पाडली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!