MD ड्रग प्रकरणातील फरार आरोपी धम्मराज तसेच तडीपार रोहीत यांना युनीट १ ने घातल्या बेड्या…
MD विक्री गुन्हयातील पाहीजे असलेला आरोपी व तडीपार इसम यास गुन्हे शाखा युनीट १ ने केले जेरबंद…
नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,संदिप कर्णिक, पोलिस आयुक्त नाशिक शहर यांनी अंमली पदार्थ विक्री व सेवन करणां-यावर कडक धोरण अवलंबिले असुन त्यांची माहिती काढुन त्यांचेवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्याअनुषंगाने प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त (गुन्हे), डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक शहर यांनी अंमली पदार्थ विक्री करणा-यांची माहिती काढुन कडक कारवाई
करण्याबाबतचे वेळोवेळी गुन्हेशाखेला मार्गदर्शन केले होते.
दि. १४/०२/२०२४ रोजी गुन्हेशाखा युनिट ०१ यांना मिळालेल्या माहीती वरून आडगाव परिसरामध्ये धम्मराज उर्फ सागर बाळासाहेब शार्दुल, रा-राजवाडा दिंडोरीरोड, म्हसरूळ नाशिक यास ताब्यात घेवून त्यांच्या अंगझडतीत २७,५००/- रूपये किंमतीची ५.५ ग्रॅम एम.डी. (मॅफेड्रॉन) तसेच मोटार सायकल, मोबाईल असा एकुण
८७,५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. सदर आरोपीताविरुध्द आडगाव पोलिस ठाणे येथे गुरनं. ४३ / २०२४ एन. डी. पी. एस. कायदा १९८५ चे कलम ८ (क), २२ (ब), २९ प्रमाणे गुन्हा दाखल होता.
सदर गुन्हा दाखल झाल्या पासुन गुन्हयातील पाहीजे असलेला आरोपी राहुल शिंन्दे फरार होता व त्याचा शोध गुन्हेशाखा युनिट
०१ घेत होती. आज रोजी सदर गुन्हयातील पाहीजे असलेला आरोपी याचा शोध घेत असतांना गुन्हेशाखा युनिट ०१ चे पोलिस अंमलदार नितीन जगताप यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, उक्त गुन्हयातील पाहीजे असलेला आरोपी राहुल शिंन्दे हा बळीमंदिर परिसरात येणार आहे अशी खात्रीशिर माहीती मिळाल्यावरून सपोनि तोडकर, पोहवा. ठाकरे,नापोशि परदेशी, पोशि पानवळ, राठोड, जगताप, शेख, पालखेडे असे मिळालेल्या बातमी प्रमाणे सदरठिकाणी जावुन सापळा लावुन थांबले असता राहुल नारायण शिंन्दे रा. हनुमान नगर अमृत धाम नाशिक यास शिताफीने पकडुन त्यास ताब्यात घेवून त्याने गुन्हयाची कबुली दिल्याने सदर आरोपीतास पुढील कारवाई कामी
आडगाव पोलिस ठाणे कडे हजर करण्यात आले आहे.
तसेच रेकॉड वरील तडीपार आरोपी यांचा शोध घेत असतांना गुन्हेशाखा युनिट ०१ चे अंमलदार राजेश राठोड यांना बातमी मिळाली की, तडीपार आरोपी रोहीत पवार हा शांतीनगर मखमलाबाद नाशिक परिसरात फिरत आहे. अशी बातमी मिळाल्यावरून पोहवा धनंजय शिंदे, देवीदास ठाकरे,नापोशि मिलींद परदेशी,पोशि पानवळ, राठोड, जगताप, शेख, बर्डे अशांनी मिळालेल्या बातमी प्रमाणे मखमलाबाद म्हसरूळ नाशिक परिसरामध्ये शोध घेवुन रोहीत योगेश पवार रा. शुभम अपार्टमेंन्ट, शांती नगर म्हसरूळ, नाशिक हा मिळुन आल्ल्याने यास ताब्यात घेवून त्याचे विरूध्द म्हसरूळ पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक साो.प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त,(गुन्हे), डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हेशाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्र. १
नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार, सपोनि हेमंत तोडकर, पोउनि चेतन श्रीवंत, विष्णु उगले, पोहवा देविदास ठाकरे, शरद सोनवणे, धनंजय शिंदे,नापोशि मिलींदसिंग परदेशी,पोशि नितीन जगताप, राजेश राठोड, राहुल पालखेडे, मुक्तार शेख, आप्पा पानवळ, रामा बर्डे,चापोशि समाधान पवार यांनी केली.