म्हसरूळ पोलिसांचा अवैध गुटखा विक्रेत्यावर छापा,६ लक्ष रु चा गुटखा केला जप्त…
म्हसरूळ पोलिसांनी जप्त केला राज्यात प्रतिबंधीत गुटख्याचा मोठा साठा,आरोपी पसार…
नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उपायुक्त, परि.-१,किरणकुमार चव्हाण,सहा. पोलिस आयुक्त, पंचवटी विभाग,नितिन जाधव यांनी
राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा, सुगंधीत तांबाखु बाळगणे, विक्री करणा-या इसमांवर कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्या अनुशंगाने मोहिम सुरू करण्यात आली आहे.
सदर मोहीमे दरम्यान दिनांक १३/४/२०२४ रोजी पोलिस शिपाई पंकज चव्हाण यांना बातमी मिळाली की,दिंडोरीरोड, कलानगर लेन १, गुरुमाउली बंगला क्रमांक ६९ येथे महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला पानमसाला व सुगंधित तंबाखु असे विकी करीता अवैधपणे साठवून ठेवला आहे. त्यावरून पोउपनि डी. वाय. पटारे, पोउपनि यु.एम. हाके, पोहवा देवराम पोशि महाले असे दिंडोरीरोड, कलानगर लेन १, गुरुमाउली बंगला क्रमांक ६९ येथे छापा कारवाई केली असता पोलिस आल्याची चाहुल लागताच भास्कर गरड हा पळुन गेला. त्याचे घराची पंचासमक्ष घरझडती घेतली असता त्यात वेगवेगळया रंगाचे प्लॅस्टीक गोण्या व खाकी रंगाचे बॉक्स दिसून आले. त्यांची पाहनी करता त्यात विमल पान मसाला, मिराज
किर काकील टोबॅको, वाह पानमसाला, व्ही – १ टोबॅको, डब्ल्यु चॅींग टोबॅको असे प्रतिबंधीत असलेला एकणु ०६,६०,०६० /- रू कि.चा पानमसाला व तंबाखु मिळून आला. त्यावरून इसम नामे भास्कर गरड याचे विरुध्द म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरचा माल कोठून आणला व त्याची विक्री कोठे होणार होती याबाबत तपास चालु आहे.
सदरची कारवाई पोलिस आयुक्त संदिप कर्णिक,पोलीस उपायुक्त,
परिमंडळ-१, किरणकुमार चव्हाण, सहा. पोलिस आयुक्त, पंचवटी विभाग,नितिन जाधव यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि सुभाष ढवळे, पोउपनि डी. वाय.पटारे,पोउपनि यु.एम.हाके, पोहवा देवराम चव्हाण, बाळासाहेब मुर्तडक, प्रशांत वालझाडे,पोशि पंकज चव्हाण, पंकज महाले, गिरिधर भुसारे, जितु शिंदे यांनी केलेली आहे.