वयोव्रुध्द महीलेस जखमी करुन अंगावरील दागिणे लुटणार्यास नाशिक रोड पोलिसांनी शिताफिने केली अटक,१६ लक्ष रु चा मुद्देमाल केला हस्तगत…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

नाशिकरोड पोलिसांनी चोरीस गेलेले १६ लाख रुपयांचे सोने केले जप्त…

नाशिक (शहर प्रतिनिधी) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस आयुक्त यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. म्हणुन त्या अनुषंगाने पोलिसांचे पथक हे कारवाई साठी गस्तीस असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तांत्रीक विश्लेषण अन् कौशल्यपूर्ण तपास करून पोलिसांनी आरोपींकडून सोन्याचे दागिने, सोन्यांच्या मण्यांची पोत, सोन्याचे डोरले असलेली छोटी पोत, सोन्याचे कर्णफुल व वेल, सोन्याचा हार, मंगळसुत्र, बांगडया, सोन्याच्या अंगठया, सोन्याचे गंठण, सोन्याची पेंडल असलेली काळया मन्याची पोत असे एकूण २८६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व लगड अंदाजे १६,५०,०००/- रु. हे जप्त करण्यात आले आहेत.







या बाबत अधिक माहिती अशी की, सामनगांव ता. जि. नाशिक येथील महिला नामे शकुंतला दादा जगताप (वय ७५ वर्षे) या दि.०१ जानेवारी रोजी दुपारी ३.४५ वा.चे सुमारास सामनगाव येथे त्यांच्या दुकानात असताना एक अनोळखी इसमाने पांढन्या रंगाच्या मोपेड गाडीवरून दुकानात येवून त्याच्याकडे असलेल्या लोखंडी रॉडने त्यांना गंभीर दुखापत करून त्यांचे अंगावरील सोन्याची पोत, व इतर दागिने असे एकुण ४ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून घेऊन गेल्याने नाशिकरोड पोलिस ठाण्यात गु.र.क्र. ०३/२०२४ भा.दं. वि. कलम ३९७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे शोध पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक गणेश शेळके हे करत होते. या सोबतच गुन्हयाच्या समांतर तपासात गुन्हे शाखा, युनिट ०१ च्या पथकाने आरोपी



पप्पु उर्फ विशाल प्रकाश गांगुर्डे (वय-३८वर्षे) रा. कैलासजी सोसायटी, एफ-०१, रूम नं. ०५, जेलरोड नाशिक रोड

यास ताब्यात घेवून नाशिकरोड पोलिस स्टेशन येथे हजर केले. अटक आरोपीने सुरूवातीस ०३ गुन्हे केल्याची कबुली दिल्याने त्यात चोरीस गेलेला माल त्याचेकडे तपास करून हस्तगत करण्याबाबत वरीष्ठ पोलिस निरीक्षक, रामदास शेळके यांनी आदेश दिले होते.

त्या अनुषंगाने वरीष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश शेळके यांनी आरोपी पप्पु उर्फ विशाल प्रकाश गांगुर्डे याचेकडे पोलिस कोठडी दरम्यान केलेल्या तपासात आरोपीने वृध्द महिलेस मारहाण करण्यासाठी वापरलेले हत्यार वाहनांचे नट बोल्ट खोलण्यासाठी वापरायचा पान्हा/रॉड, प्लंजर मोटारसायकल क्र. एमएच १५ डीडब्ल्यू २२५ ही आरोपीकडून गुन्हयात जप्त करण्यात आलेली आहे. आरोपीस विश्वासात घेवून तांत्रिक विश्लेषण, प्राप्त सीसीटीव्ही फुटेज, आरोपी सातत्याने बदलत असलेली ठिकाणे याबाबत सखोल आणि कौशल्यपुर्ण चौकशी करून केलेल्या तपासात आरोपीने एकुण ०७ गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. तसेच आरोपीने खालील नमुद गुन्हयांतील चोरलेले सोन्याचे दागिने विक्री केलेले सोनार यांचा शोध घेवून त्यांचेकडे तपास करून त्यांचे ताब्यातून खालील वर्णनाचा व किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

१) सोन्याचे दागिने त्यात सोन्यांच्या मण्यांची पोत, सोन्याचे डोरले असलेली छोटी पोत, सोन्याचे कर्णफुल व वेल (१७ ग्रॅम)

२) सोन्याचे दागिने त्यात सोन्याचा हार, मंगळसुत्र, ०२ बांगडया, ०२ सोन्याच्या अंगठया व सोन्याचे गंठण (१४५ग्रॅम)

३) सोन्याचे दागिने त्यात ४ सोन्याच्या बांगडया, सोन्याची पॅन्डल असलेली काळया मन्याची पोत (५५ग्रॅम)

४) १५ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड

५) १९ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड

६) ३५ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड

असे एकूण २८६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व लगड अंदाजे १६,५०,०००/- रु. हे जप्त करण्यात आले आहेत.

वरील नमुद गुन्हयांत चोरीस गेलेले सोने खरेदी करणारे सोनार

१) प्रशांत विष्णुपंत नागरे (वय ४३ वर्षे) व्य. सराफ दुकान, रा. गुरुकृपा हा.सोसायटी कॅनलरोड, जेलरोड, नाशिकरोड

२) हर्षल चंद्रकांत म्हसे (वय ४२ वर्षे) व्य. सराफ दुकान रा.सिल्वर नेस्ट अपार्ट, विजय नगर, जयभवानी रोड, नाशिकरोड, नाशिक

३) चेतन मधुकर चव्हाण (वय ३० वर्षे) व्य.सराफ दुकान, रा.महात्मा फुले चौक, जव्हार, जिल्हा, पालघर

यांना नमुद गुन्हयात अटक करण्यात आली आहे. गुन्हयात अटक आरोपीकडे तपास करून आरोपींविरोधात अधिकाधिक पुरावे प्राप्त करून गुन्हयाचा तपास करत आहोत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलिस आयुक्त संदिप कर्णीक, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ-२ श्रीमती मोनिका राउत, सहा. पोलिस आयुक्त, नाशिकरोड विभाग डॉ.सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, पवन चौधरी पोलिस निरीक्षक (गुन्हे), गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश शेळके, पोहवा. विनय टेमगर,विष्णु गोसावी, नापोशि. बच्चे, पोशि. सागर आडणे, गोकुळ कासार, रोहित शिंदे, अरुण गाडेकर,. मनोहर कोळी, नाना पानसरे, यशरान पोतन, संतोष पिंगळ, भाऊसाहेब नागरे चापोशि. रानडे, कल्पेश नाथव यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!