नाशिक ग्रामीण LCB ची अवैध दारु वाहतुक करणार्यावर चौफेर कार्यवाही…
स्थानिक गुन्हे शाखेची अवैध मद्यसाठा वाहतुक करणा-यांवर चौफेर धडक कारवाई, वणी व चांदवड परिसरात १५ लाखांचा अवैध मद्यसाठा केला जप्त…
नाशिक(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने, अपर पोलिस अधिक्षक आदित्य मिरखेलकर, अपर पोलिस अधिक्षक मालेगाव अनिकेत भारती यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीण जिल्हयात अवैध मद्यसाठा वाहतुक करणा-यांवर कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केले होते
त्याअनुषंगाने दि २० डिसेंबर २०२४ रोजी वणी पोलिस ठाणे हद्दीत कसबे वणी गावातील के. आर.टी. कॉलेजचे समोर वणी ते सापुतारा जाणारे रोडवर अवैधरित्या मद्याची वाहतुक होत असल्याची गोपनीय माहीती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने वणी ते सापुतारा जाणारे रोडवर सापळा रचुन एका हयुंडई कंपनीचे इयॅान कारवर छापा टाकुन देशी मद्याचा १,६८,७००/- रू. किंमतीचा अवैध मद्यसाठा व हयुंडई इयॅान कार वाहन असा एकुण ३,१८,७००/- रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर छापा कारवाईत इसम साईनाथ भारत जाधव, वय २५, रा. वागळुद, पो. लखमापुर, ता. दिंडोरी, जि. नाशिक हा विनापरवाना बेकायदेशीररित्या देशी व विदेशी मद्याची वाहतुक करतांना मिळुन आला आहे. सदरचा अवैध मद्यसाठा हा त्याचा साथीदार किरण नागरे, रा. रामवाडी, नाशिक याचे दुकानातुन भरून आल्याचे त्याने सांगीतले यावरुन सदर दोन्ही इसमांविरूध्द वणी पोलिस ठाणे येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे दुसर्या एक कार्यवाहीत चांदवड पोलिस ठाणे हद्दीत गणुररोड आशिष वाईन शॉप येथे अवैधरित्या मद्याची वाहतुक होत असल्याची गोपनीय माहीतीवरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे यांचे पथकाने पथकाने चांदवड ते देवळा जाणारे रोडवर सापळा रचुन एका मारूती इर्टीगा कारवर छापा टाकुन देशी मद्याचा २१,०००/- रू. किंमतीचा अवैध मद्यसाठा, तीन मोबाईल फोन व हयुंडई इवॉन कार वाहन असा एकुण १०,३१,०००/- रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर छापा कारवाईत इसम १) सागर रमेश कोतवाल वय ३०, २) प्रसाद किशोर सोनवणे, वय २४, दोन्ही रा. चांदवड, ता. चांदवड, जि. नाशिक, हे विनापरवाना बेकायदेशीररित्या देशी मद्याची वाहतुक करतांना मिळुन आले आहे. सदर दोन्ही इसमांविरूध्द चांदवड पोलिस ठाणेस महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरच्या दोन्ही कार्यवाही पोलिस अधिक्षक, विक्रम देशमाने, अपर पोलिस अधिक्षक, आदित्य मिरखेलकर, अपर पोलिस अधीक्षक, मालेगाव अनिकेत भारती, कळवण उपविभागीय पोलिस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी, मनमाड उपविभागीय पोलिस अधिकारी बाजीराव महाजन यांचे मार्गदर्शनखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे, सफौ, सुदाम मुंगसे, पोहवा. किशोर खराटे, सचिन देसले, प्रविण गांगुर्डे, नापोशि नितीन डावखर, प्रदिप बहिरम, हेमंत गिलबीले, पोशि, सागर खाडे, प्रविण पवार, पुरुषोत्तम वाटाणे, सुनिल गांगोडे, किशोर बोडखे, ज्ञानेश्वर गांगुर्डे, तसेच चालक पोशि, हेमंत वाघ यांचे पथकाने केली आहे.