मालेगाव येथील मोटारसायकल चोरीचे गुन्हे शाखेने केले उघड…
मालेगावातील अट्टल मोटरसायकल चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात,मोटारसायकल चोरीचे अनेक गुन्हे केले उघड…
नाशिक(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नाशिक ग्रामीण जिल्हयातील मोटर सायकल चोरीचे वाढत्या गुन्हयांना प्रतिबंध होण्यासाठी पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने यांनी नाउघड गुन्हयांचा आढावा घेवून त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे यांचे पथकास आदेशीत केले होते त्यानुसार
दिनांक २४/०७/२०२४ रोजी स्थागुशाचे पथक हे मालेगाव शहरातील नाउघड मोटरसायकल चोरीचे गुन्हयांचा समांतर तपास करीत असतांना, गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मालेगाव शहरातील बाग-ए-मेहमुद परिसरात काही संशयीत चोरीच्या मोटर सायकल विक्री करण्याचे उद्देशाने येणार असल्याचे
खात्रीशीररित्या समजले. त्यावरून पोलिस पथकाने बाग-ए-मेहमुद परिसरात सापळा रचून संशयीत ईसम १) जहिर अहमद अब्दुल मजीद, वय ४०, रा. बाग- ए- मेहमुद, मालेगाव, जि. नाशिक यास ताब्यात घेतले.
त्याचे कब्जात मिळून आलेल्या बजाज डिस्कव्हर मोटर सायकलचे कागदपत्रांबाबत विचारपुस केली असता,त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यास विश्वासात घेवून चौकशी केली असता त्याने व त्याचा साथीदार २) इम्रान, रा. म्हाळदे, मालेगाव अशा दोघांनी मिळून सदरची मोटर सायकल मालेगाव छावणी परिसरातुन चोरी
केल्याची कबुली दिली आहे.यातील ताब्यात घेतलेला आरोपी जहिर अहमद अब्दुल मजीद यास अधिक विश्वासात घेवून सखोल
चौकशी केली असता, त्याने त्याचा साथीदार इम्रान याचेसह मालेगाव, नांदगाव, चांदवड परिसरातुन ०३ मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपीचे कब्जातुन ०१ बजाज डिस्कव्हर, ०१ हिरो एच.एफ. डिलक्स, ०१ हिरो स्प्लेंडर अशा एकुण ०३ चोरीच्या मोटर सायकल किं. रु.८०,०००/- रुपये चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर आरोपीने कबुली दिल्यावरून मालेगाव छावणी, चांदवड, नांदगाव पोलीस ठाण्यांमध्ये दाखलअसलेले मोटर सायकल चोरीचे ०३ गुन्हे उघडकीस आलेले आहेत. यातील आरोपींना मालेगाव छावणी पोलिस ठाणेकडील गुरनं २०९/२०२४ भादवि कलम ३०३ (२) या गुन्हयात हजर करण्यात आले आहे. सदर गुन्हयातील आरोपी जहिर मजीद याचा साथीदार इम्रान हा फरार असून पोलिस पथक त्याचा कसोशिने शोध घेत आहे, सदर आरोपींकडून मोटर सायकल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने, अपर पोलिस अधिक्षक मालेगाव अनिकेत भारती, सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी मालेगाव शहर विभाग तेघबीर संधु, सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी कॅम्प विभाग सुरज गुंजाळ यांचे मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे, पोहवा चेतन संवत्सरकर, नापोशि गिरीष बागुल, शरद मोगल, सुभाष चोपडा, योगेश कोळी,दत्ता माळी, देवा गोविंद, नरेंद्र कोळी यांचे पथकाने मोटर सायकल चोरीचे ०३ गुन्हे उघडकीस आणुन कामगिरी केली आहे.