गुजरात राज्यातुन महाराष्ट्राच्या सिमावर्ती भागात गुटख्याची तस्करी करणारे पुरवठादार LCB च्या ताब्यात…
जिल्हयाचे सीमावर्ती भागातुन गुटख्याची तस्करी करणारे गुजरात राज्यातील पुरवठादार नाशिक ग्रामीण स्थागुशा पथकाचे जाळयात…
दिंडोंरी हद्दीत नाशिक ग्रामीण स्थागुशा ने पकडला ६.६४ लक्ष रु चा गुटखा….
नाशिक(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,महाराष्ट्र शासनाच्या अधिसुचनेनुसार मानवी आरोग्याच्या दृष्टीने गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखू तसेच मानवी आरोग्यास हानीकारक असणा-या खाद्यपदार्थांची विक्री, उत्पादन, साठवणुक, वाहतुक आदी व्यवसायांना प्रतिबंधीत करण्यात आलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण जिल्हा पोलुस अधीक्षक विक्रम देशमाने यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे ग्रामीण पोलिसांची जिल्हाअंतर्गत गुटख्याची वाहतूक, विक्री, वितरण व साठवणूक करणा-यांविरूध्द कारवाई सुरू आहे.
त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने पेठ तालुक्यातील पिठुदीनाका तसेच दिंडोरी तालुक्यातील रासेगाव शिवारात सुरत महामार्गावर गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणारे पिकअप व
इनोव्हा वाहनावर छापे टाकून सुमारे १४ लाख रूपये किंमतीचा अवैध गुटखा जप्त करून कारवाई केली होती. सदर गुन्हयांमध्ये वाहनांवरील चालकांना अटक करून त्यांचेकडे चौकशी केली असता, गुजरात राज्याचे सीमावर्ती भागातुन नाशिक जिल्हयात गुटख्याची अवैधरित्या तस्करी केली जात असल्याची माहिती समोर आली होती.
त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने वरील गुन्हयांचे तपासात गुजरात राज्यातुन गुटख्याची अवैधरित्या बेकायदेशीरित्या कुठलीही बिल व जी. एस. टी. पावती न देता, पुरवठा करणारे खालील दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. १) किशोर गणेशाराम माळी, वय २१, रा. चिरंजीवी हॉस्पिटल जवळ, पहाडी रोड, नानापोंडा, ता.कपराडा, जि. वलसाड, राज्य गुजरात २) उमेश वालाराम चौधरी, वय ३३, रा. सुतारपाडा, ता. कपराडा, जि. वलसाड, राज्य गुजरात यातील आरोपींना अनुक्रमे पेठ पो.स्टे. गुरनं ६२ / २०२४ भादवि कलम ३२८ व दिंडोरी पो.स्टे. २०१ / २०२४ भादवि कलम ३२८ या गुन्हयांमध्ये अटक करण्यात आली आहे. यातील आरोपी हे गुटख्याची अवैधरित्या तस्करी करून नाशिक सह इतर कोणत्या ठिकाणांवर गुटख्याचा पुरवठा करीत होते, तसेच सदर गुटखा कोण खरेदी करणार होते याबाबत पोलीस पथक कसोशिने तपास करीत आहे.
जिल्हयात परराज्यातुन येणारे अवैध गुटख्याचे नेटवर्कचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ग्रामीण पोलीसांची पथके सर्वत्र कारवाई करत असून गुटखा तस्करीचे पाळेमुळे खोदण्यास पोलिसांना मदत होणार आहे.
सदरची कार्यवाही नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने,अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे, सपोनि गणेश शिंदे, पोउनि नाना शिरोळे, पोलिस अंमलदार किशोर खराटे, प्रविण सानप, गिरीष बागुल, सुधाकर बागुल, उदय पाठक, शिवाजी ठोंबरे, विश्वनाथ काकड, सागर काकड, मेघराज जाधव, मनोज सानप, प्रदिप बहिरम, हेमंत गिलबिले, विनोद टिळे यांचे पथकाने सदरची कारवाई केली आहे.