अवैधरित्या शस्त्र बाळगणारा नाशिक ग्रामीण पोलिसांचे विशेष पथकाचे ताब्यात…
ओझर-१० वा मैल परिसरात देशी बनावटीचे ०२ पिस्टल व ०४ जिवंत काडतूसे जप्त,नाशिक ग्रामीण पोलिसांचे विशेष पथकाची कारवाई….
नाशिक(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,येणारे नववर्ष व ३१ डिसेंबर २०२३ च्या पार्श्वभुमीवर नाशिक ग्रामीण जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांचे आदेशान्वये ग्रामीण पोलिसांनी अवैध शस्त्रे विरोधी मोहिम हाती घेतली आहे
त्याअनुषंगाने दिनांक २४/१२/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गुप्त बातमीनूसार मालेगाव शहरातून एका टॅक्सीमध्ये काही संशईत ईसम घातक अग्निशस्त्र कब्जात बाळगून नाशिकच्या दिशेने येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी ओझर १० वा मैल परिसरात सापळा रचून संशईत टॅक्सी क्र. एम.एच.१५.जी.व्ही. २७५८ हे वाहन अडवून, वाहनातील संशईत नामे
मोहम्मद आरिफ मोहम्मद फारूख, वय ३६, रा. रजियाबाद,मालेगाव, ता. मालेगाव
याची झडती घेतली असता, त्याचे कब्जात एका बॅगमध्ये देशी बनावटीचे ०२ पिस्टल व ०४ जिवंत काडतूसे मिळून आली. सदर इसम हा विनापरवाना बेकायदेशीररित्या घातक अग्निशस्त्र कब्जात बाळगतांना मिळून आला असून त्याचेविरूध्द ओझर पोलिस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप व अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील तसेच विशेष पथकातील पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, सपोउनि दिपक आहिरे, शांतराम नाठे, पोहवा सचिन धारणकर, चेतन संवत्सरकर, पोकॉ विनोद टिळे, गिरीष बागुल यांचे पथकाने सदरची कारवाई केली आहे.
आगामी नववर्ष व ३१ डिसेंबर २०२३ च्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांविरूध्द वरील प्रमाणे कारवाई करण्यात येणार असून कोणीही इसम अवैध शस्त्रे बाळगून गुन्हेगारी कारवाया तसेच दहशत निर्माण करीत असेल तर, नाशिक ग्रामीण पोलिस दलाचे अवैध व्यवसायविरोधी हेल्पलाईन कमांक ६२६२ २५ ६३६३ यावर संपर्क करावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.