लोखंड चोरी करणाऱ्या आरोपीच्या दैठणा पोलिसांनी आवळल्या मुसक्या

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

लोखंड चोरी करणाऱ्या आरोपीच्या दैठणा पोलिसांनी आवळल्या मुसक्या

परभणी – दैठणा हद्दीत रात्री लोखंड चोरी करणाऱ्या आरोपीस पकडण्यात दैठणा पोलिसांना यश मिळाले आहे. फिर्यादी शकुरखा रोशनखा पठाण, बोरवंड खु, ता.जि. परभणी आणि गोविंद गणपतराव सोळंके अमडापुर, ता.जि. परभणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मुंजाजी उर्फ पप्पू रमेश पवार (वय 36 वर्षे), राहणार प्रसाद नगर, परभणी याच्यावर 427/2023 कलम 379, 429/2023 कलम 379, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपीने फिर्यादीच्या आमडापूर येथील देवकृपा वेल्डींग वर्कशॉप दुकानाच्या बाहेरील वेल्डींग साठी असलेले प्रत्येकी 2,000/- रुपये किंमतीचे 60 पाईप चोरट्यांनी ॲटोत टाकून चोरून नेले. अशी माहिती त्यांना मिळाल्यावरून त्यांनी आजूबाजूचे नागरीक व पोलीसांना फोन करून माहिती दिली. त्यापैकी काही जणांनी त्यास शिंगणापुर रेल्वे गेटजवळ पकडून पोलीसांच्या स्वाधीन केले.



सदर आरोपीस दैठणा पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यास विश्वासात घेवून चौकशी केली असता त्याने गु.र.नं. 427/2023 हा गुन्हा देखील केल्याची माहिती दिली आहे. सदर गुन्ह्यात आज पावेतो एकूण 1,60,000/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.



अशा प्रकारे सदरची कारवाई पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर.आणि अपर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बी.आर.बंदखडके, पोलिस अंमलदार बळीराम मुंढे, नागनाथ फड, विठ्ठल कुकडे, बळीराम करवर यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!