अनोळखी महीलेच्या खुनाचा परभणी पोलिसांनी ४८ तासाचे आत केला उलगडा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

अनोळखी महिलेच्या प्रेताची ओळख पटवुन खुनाच्या गुन्हयातील आरोपींना ४८ तासात अटक,शुल्लक रागातुन खुन केल्याचे उघड…

परभणी(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१४) सप्टेंबर २०२४ रोजी विजयनगर जवळील रेल्वे स्टेशनच्या मोकळया पडीक जागेत काटेरी झुडूपांमध्ये, पूर्णा येथे एका ४५-५० वयोगटातील अनोळखी महिलेचे प्रेत आढळून आले होते. तिच्या तोंडावर, डोक्यात गंभीर जखमांवरून सदर महीलेचा खून झाला असल्याचे दिसून आल्याने पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी तात्काळ अपर पोलिस अधिक्षक यशवंत काळे,सहा.पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,जिंतुर अतिरिक्त प्रभार पुर्णा जीवन बेनीवाल, अशोक घोरबांड पोलिस निरीक्षक स्थागूशा परभणी यांना मार्गदर्शन करून स्टाफसह घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या. सोबत फॉरंन्सीक टिमला रवाना केली होती.





यावरून सहा पोलिस अधिक्षक जीवन बेनीवाल सहाय्यक पोलीस निरीक्षक  अशोक घोरबांड यांनी स्थागुशाचे सपोनि  पी. डी. भारती पोलिस अंमलदार रंगनाथ दूधाटे, हनुमान ढगे, सचिन भदर्गे, दिलीप निलपत्रेवार, परसराम गायकवाड यांना सोबत घेऊन सदर गुन्हयाचे घटनास्थळाला भेट दिली. सदर गुन्हयातील घटनास्थळाची फॉरेन्सीक टिमसह बारकाईने पाहणी केली. तसेच पारंपारीक तपास पध्दती व गुप्त बातमीदारांकडून मयत महीलेचा फोटो व्हॉटसअॅपवर व्हायरल करून यातील मयत महीला ही रमाबाई भ्र. अनिल चिकाटे वय ५० वर्षे रा. विजयनगर पूर्णा हिची ओळखदार कडून ओळख पटवून असल्याचे निष्पन्न केले.



सदर प्रकरणी यातील मयत महीलेचा मूलगा  श्याम अनिल चिकाटे वय २९ वर्षे व्यवसायः- मजूरी रा. सिध्दार्थनगर पूर्णा याचे फिर्यादवरून पो. स्टे. पूर्णा येथे गूरनं ३११/२४ कलम १०३(१), २३८ भान्यासं प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. सदर गुन्हयाचा स्थागूशा परभणी व पो. स्टे. पूर्णा यांचेकडून संयूक्तपणे तपास सूरू असताना गूप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, सदरचा गुन्हा माणिक मूळे रा. पूर्णा याने त्याचे साथीदारसह केला आहे. सदर माहीतीवरून आरोपी १) माणिक रामचंद्र मूळे वय ४० वर्षे रा. शिवाजीनगर पूर्णा यास निष्पन्न करुन त्यास ताब्यात घेऊन त्याचेकडे विश्वासाने विचारपूस केली असता, यातील माणिक मूळे व मयत महीला  रमाबाई चिकाटे हिचे दारू अडडयासमोर दारू पिण्याचे कारणावरून वाद झाला होता. सदर महीलेने त्याला दारू घेण्यासाठी दहा रूपये मागितले असता, त्याने तिला दहा रूपये न दिल्याने तिने त्याला चप्पलने मारले. त्याचा राग मनात धरून आरोपी याने दारू पाजण्याचे बहाण्याने रेल्वे पटरीच्या बाजूला मोकळ्या जागेत नेले व त्या दोघांनी दारू पिली. त्यावेळी त्या ठिकाणी माणिक मूळे याच्या ओळखीचे दोघेजन तिथे आले. त्या चौघांनी मिळून एकत्रीत दारू पिली व सर्वांसमक्ष चपलेने मारल्याच्या कारणावरून तिच्या तोंड व डोके दगडाने ठेचून मारून तिचा खून केला व पूरावा नष्ट करण्याच्या उददेशाने तिचा मृतदेह तिघांनी फरपटत आणून काटेरी झुडूपात फेकून दिला



नमूद महीलेच्या खूनामध्ये आरोपी १) माणिक रामचंद्र मूळे वय ४० वर्षे रा. मूळेगल्ली शिवाजीनगर पूर्णा २) आवेज कुरेशी युसुफ कुरेशी वय ३० वर्षे ३) शादुल कुरेशी युसुफ कुरेशी वय २६ वर्षे दोन्ही रा. कुरेशी मोहल्ला, पुर्णा यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर तिन्ही आरोपींना स्थागूशा पथकाने ताब्यात घेतले असून, त्यांना पूढील कायदेशीर कार्यवाहीस्तव पो. स्टे. पूर्णा यांच्या ताब्यात दिले आहे.

सदरची कामगिरी  पोलिस अधिक्षक  रविंद्रसिंह परदेशी, अपर पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांचे मार्गदर्शनाखाली,सहा पोलिस अधिक्षक पोलीस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,जिंतुर जीवन बेनीवाल यांचे नेत्रुत्वात पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अशोक घोरबांड, पोलिस निरीक्षक,पोलिस स्टेशन,पुर्णा विलास गोबाडे,सहा पोलिस निरीक्षक  पी. डी. भारती स्थागूशा रामकिशन नांदगावकर,पोउपनि चंदनसिंह परीहार, प्रकाश इंगोले, पोलिस अंमलदार रंगनाथ दुधाटे, सचिन भदरगे, हनुमान ढगे, दिलीप निलपत्रेवार, परसराम गायकवाड, साहेब मानेबोईनवाड, अजय माळकर, संदीप चौरे, मंगेश जूकटे, रमाकांत तोटेवाड, गणेश कौटकर, प्रशांत लटपटे, स्वप्नील पोतदार यांनी केली





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!