शेतशिवारातुन कापुस चोरणारे सराईत चोरटे LCB पथकाचे ताब्यात…
शेतकऱ्यांचा कापूस चोरणारे चोरटे गजाआड…
परभणी (प्रतिनिधी) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्या आधीच हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर यांनी सर्व पोलिस अधिकाऱ्यांना या आधी झालेल्या गुन्ह्यांची, तसेच चालु असलेले अवैध धंदे, गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. म्हणुन पोलिसांचे पथक कारवाई साठी गस्तीस असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून शेतकऱ्यांचा कापूस चोरणाऱ्या चोरट्यांना पकडण्यात सेलू पोलिसांना यश मिळाले आहे. या प्रकरणी फिर्यादी श्रीनिवास ज्ञानेश्वर पवार, रा.शिंदे टाकळी, ता.सेलू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भा.दं.सं. 529/2023 कलम 379 अंतर्गत आरोपी
1) अशोक सदाशिव पवार, (वय 27 वर्ष), रा.शिंदे टाकळी ह.मु.पारिजात कॉलनी सेलू
2) अनिल ऊर्फ विठ्ठल पवार, (वय 24 वर्षे), रा.शिंदे टाकळी ता.सेलू
यांच्यावर सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. या मध्ये गेलेला माल – 1) 1,32,000/- रूपयाचा एकुण 22 क्विंटल कापुस,2) 2,00,000/- महिंद्रा मॅक्स पिकअप आरटीओ पासिंग क्र. MH23-4009 आदी होता.
यातील भानुदास श्रीरंग पवार, रा.शिंदे टाकळी, ता.सेलु यांच्या मालकीचे कापुस फिर्यादीचे महिंद्रा मॅक्स पिकअप वाहन क्र.MH 23 – 4009 मध्ये भरून कापसाचे वर ताडपत्री टाकुन रसीने बांधुन शिंदे टाकळी ता. सेलु येथील ग्रामपंचायत कार्यालया समोर मोकळ्या जागेत उभे केले असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने पिकअप वाहन व आतील कापुस किंमती 3,32,000/- रु.चा माल चोरून नेला आहे. पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करण्या बाबत स्था.गु.शा. चे पथकास आदेश दिल्यावरून त्या करीता पथक नेमले.
दि.04 जानेवारी रोजी गोपनीय माहितीच्या आधारे व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे सदर आरोपीस सापळा रचून मोठ्या शिताफीने सेलू येथून ताब्यात घेतले असता त्यांनी सदर गुन्हा केल्याचे सांगीतले व त्यांच्या ताब्यातून1) 54,900/- रूपयाचा एकुण 9 क्विंटल कापुस २) 2,00,000/- महिंद्रा मॅक्स पिकअप आरटीओ पासिंग क्र. MH23-4009 वरीलप्रमाणे मुद्देमाल ताब्यात घेवून सदर आरोपींना पुढील कायदेशीर कारवाई कामी पोलिस स्टेशन सेलू येथे हजर करण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. अपर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक व्हि. डी.चव्हाण, पोउपनि, गोपीनाथ वाघमारे, स्था.गु.शा. परभणी, पोलिस अंमलदार विलास सातपूते, सिध्देश्वर चाटे, विष्णू चव्हाण, मधूकर ढवळे, नामदेव डुबे, राम पौळ, संजय घुगे ने.स्था.गु.शा. बालाजी रेड्डी, गणेश कौटकर यांनी केली आहे.