भोसरी येथील मोबाईल शॅापी फोडणारे, दरोडा पथकाच्या तावडीत,१२ लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत…
पिंपरी-चिंचवड(महेश बुलाख) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक २९/०९/२०२३ रोजी क्लासिक कम्युनिकेशन मोबाईल शॉपी, संविधान चौक, नाशिक-पुणे हायवे, भोसरी, पुणे येथे अज्ञातांनी मोबाईल शॉपीचे टेरेसवरील स्लॅबचे बाजूला बसवलेला बार कटरच्या सहायाने कट केला व त्यातुन आत प्रवेश करून घरफोडी चोरी करुन १५,१८,९६२ रु किंमतीचे अॅप्पल व सॅमसंग तसेच इतर कंपनीचे एकूण २७ महागडे मोबाईल फोन हे चोरुन नेले होते. त्याबाबत भोसरी पोलिस स्टेशन, पिंपरी चिंचवड येथे गुन्हा रजिस्टर नंबर- ७७१/२०२३, भा.द.वि. कलम ४५४,४५७,३८०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील दरोडा विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार हे सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना पोलिस शिपाई सुमित देवकर यांना मिळालेल्या गोपनिय बातमीच्या अनुशंगाने सहायक पोलिस निरीक्षक अंबरिष देशमुख यांनी तांत्रिक विश्लेषन करुन सदर गुन्हा करणारे आरोपी हे कुर्ला मुंबई परिसरातील असल्याचे निष्पन्न केले. त्यानुसार दरोडा विरोधीतील पोलिस उप-निरीक्षक भरत गोसावी, सहायक पोलिस उप निरीक्षक महेश खांडे, पोलिस नायक नितीन लोखंडे, पोलिस हवालदार गणेश हिंगे, पोलिस नाईक गणेश
कोकणे व पोलिस शिपाई ,सुमित देवकर यांच्या पथकाने सलग दोन दिवस कुर्ला, मुंबई व अंबरनाथ, ठाणे या परिसरात शिताफिने तपास करुन आरोपी
१) कामील हुसेन अन्सारी वय ३३ रा. रुम नं ३२ शास्त्रीनगर प्लॉट नं १ ब्रांदा बस डेपोजवळ वेस्ट, मुबंई- ५०
२.)फिरोज नईम खान वय ३३ वर्षे, रा. आंळदी रोड, आंळदी फाटा चाकण पुणे.
यांना ताब्यात घेवुन अटक करुन तपास केला असता. आरोपी क्रं २ याने आरोपी क्रं १ याचे सांगणेवरुन सदरचा गुन्हा केला असल्याचे व सदर गुन्हा केल्यानंतर आरोपी क्रं १ याने सदर गुन्हयातील मोबाईल फोन हे विक्री करीता स्वतः कडे ठेवल्याचे निष्पन्न झाले. आरोपी क्रं १ कामिल हुसेन अन्सारी याचे कुर्ला मुंबई परिसरात मोबाईल विक्री व रिपेअरींग चे दुकान असुन सदर आरोपीकडुन गुन्हयात चोरीस गेलेल्या महागडया मोबाईल फोन पैकी ११,६८,२७० रुपय किंमतीचे २१ मोबाईल फोन आतापर्यंत जप्त करण्यात आले असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक भरत गोसावी हे करीत आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही विनयकुमार चौबे ,पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड, . डॉ.संजय शिंदे सह पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड, वसंत परदेशी, अपर पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड, स्वप्ना गोरे, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड, बाळासाहेब कोपनर ,सहाय्यक पोलिस आयुक्त, गुन्हे १,यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील, सहायक पोलिस निरीक्षक अंबरिष देशमुख, पोलिस उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलिस अंमलदार महेश खांडे, नितीन लोखंडे, सुमित देवकर, गणेश हिंगे, प्रविण कांबळे, आशिष बनकर, गणेश कोकणे, गणेश सावंत, विनोद वीर विक्रांत गायकवाड, सागर शेडगे पो हवा माळी, व पोशि हुलगे यांनी केली आहे.