महीलेचा पाठलाग करुन छेड काढणार्याच्या हिंजवडी पोलिसांनी आवळल्या मुसक्या..

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

हिंजवडी (पिंपरी-चिंचवड़) महेश बुलाख – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक ३०/०८/२०२३ रोजी ०७:३० वा. चे सुमारास एक महीला या उत्सव होम सोसायटी शेजारी वेलनेस मेडीकल समोरील रोडवर बावधन पुणे येथे फळे आणण्यासाठी पायी गेल्या असताना एक काळया रंगाची स्कुटर वरील लाईनींगचा टी शर्ट घातलेला गोल चेहऱ्याचा उंचीने कमी असलेला इसमाने फिर्यादी यांचा वारंवार पाठलाग करून प्रथम उत्सव होमच्या समोर अडवुन गाडीवर बसण्यास विचारणा करून पुन्हा सुर्यदत्ता कॉलेज समोर सदर महीलेस थांबऊन फिर्यादी यांची इच्छा नसताना “कम अँड सिट” असे इंग्रजीत बोलून फिर्यादी यांनी त्याचे बोलण्याकडे दुर्लक्ष
केले तरीही  पुढे चालत जात असताना पुन्हा पाठलाग करीत पाठीमागुन स्कुटर वर येऊन अचानक जवळ येऊन फिर्यादी यांनी तोंड वळवले असताना गाडीवरूनच फिर्यादी यांचे छातीस स्पर्श केला त्यामुळे फिर्यादी यांचे मनास लज्जा उत्पन्न झाल्याने हिंजवडी पोलीस ठाणे गुरनं १०६५ / २०२३,भादवि कलम ३५४, ३५४(ड), ३४१,५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता
सदरचा गुन्हा हा गंभीर असल्याने या गुन्ह्याची वरिष्ठ पातळीवर गंभीर दखल घेतली होती. . डॉ. काकासाहेब डोळे  पोलिस उपायुक्त परिमंडळ २ यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी हिंजवडी पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाला सुचना दिल्या होत्या.
डॉ. विवेक मुगळीकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि सागर काटे तसेच सपोनि राम गोमारे यांनी सदर गुन्ह्याचा तात्काळ तपास चालु करून तपास पथकातील अंमलदार यांना सुचना देऊन बावधन परिसरातील एकुण ८७ सीसीटीव्ही फुटेज चेक करून संशईत वाहन टीव्हीएस स्कुटी पेप मोपेड हे निष्पन्न केले. परंतु आरोपी निष्पन्न होत नव्हता, त्यामुळे महीनाभरापासुन बावधन परिसरात वेशांतर करुन ट्रॅप लाऊन संशईत स्कुटी पेप
वाहनधारकांवर लक्ष ठेऊन केलेल्या तपासामध्ये आरोपी

विलास राम गवळी, वय २८, रा. करंजावणे यांची रूम, कानिफनाथ मंदीरासमोर, बावधन, पुणे मुळ गाव रा. मु.पो. नवगाव, ता.पैठण, नवगाव, औरंगाबाद





यास ताब्यात घेऊन त्याचेकडे कौशल्याने तपास करून त्याने दाखल गुन्हा केल्याचे कबुल केले त्यास दि. १६/१०/२०२३ रोजी ०८:३० वा. दाखल गुन्ह्यात अटक केली आहे
.
सदरची कारवाई विनयकुमार चौबे पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड,
डॅा संजय शिंदे ,सह. पोलीस आयुक्त,  वसंत परदेशी  अप्पर
पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड, , श्री. डॉ. काकासाहेब डोळे, पोलिस उप आयुक्त परिमंडळ २,पिंपरी चिंचवड,  डॉ. विशाल हिरे, सहा पोलिस आयुक्त, वाकड विभाग वाकड, यांचे मार्गदर्शनाखाली डॉ. विवेक मुगळीकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सुनिल दहिफळे, पोलिस
निरीक्षक (गुन्हे), सोन्याबापु देशमुख, पोलिस निरीक्षक (गुन्हे), तपास पथकाचे प्रमुख सागर काटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, राम गोमारे, सहायक पोलिस निरीक्षक पोलीस अंमलदार बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, बापुसाहेब धुमाळ, योगेश शिंदे, कैलास केंगले, कुणाल शिंदे, अरूण नरळे, रितेश कोळी, चंद्रकांत गडदे, श्रीकांत चव्हाण, नरेंद्र बलसाने, कारभारी पालवे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, दत्ता शिंदे, सागर पंडित यांनी केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!