वाकड पोलिसांनी उधळला जबरी चोरीचा डाव…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

वाकड(पिंपरी-चिंचवड)-महेश बुलाख

सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक .१२/०९/२०२३ रोजी फिर्यादी नामे मुकेशकुमार जिवाराम लोहार रा. नेहरुनगर, पिंपरी पुणे यांनी पोलिस स्टेशन मध्ये येवुन फिर्याद दिली की ते उमेश जैन यांचे श्री अंबीका ज्वेलर्स, नेहरुनगर पिंपरी पुणे यांचेकडे नोकरीस असुन जैन हे सोन्याचे होलसेल व्यापारी आहे. छोटया दुकानदारांचे मागणी प्रमाणे ऑर्डर घेवून त्यांना सोन्याचे दागीने पुरविण्याचे काम  ते करतात. फिर्यादी व त्यांचे सहकारी खुलाराम परीहार यांना पिंपरी चिंचवड परीसरातील छोटया सोनारांकडे जावुन त्यांचेकडुन दागीन्यांची ऑर्डर घेण्याचे काम आहे.दि.०८/०९/२०२३ रोजी सकाळी ११.०० वा सुमा फिर्यादी व त्यांचा सहकारी खुलाराम परीहार असे मोटार सायकलवर मार्केटींग करीता सोबत ८०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने घेवुन पिंपरी चिंचवड परीसरात फिरणेकामी रवाना झाले. दुपारी ३.१५ वा चे सुमारास १६ नंबर थेरगाव पुणे येथील नारायण ज्वेलर्स दुकानात भेट देवून तेथुन पुन्हा नेहरुनगर पिंपरी कडे जात असताना काळेवाडी फाटयाचे अलिकडे एका काळया रंगाचे स्प्लेण्डर मोटार सायकलवरील दोन अनोळखी इसमांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला परंतु तेथे गर्दी असल्याने थांबविता आले नाही. त्यानंतर फिर्यादी हे एम्पायर इस्टेटचा ब्रिज चढत असताना पुन्हा सदरचे मोटार सायकलवरील चोरटयांनी येवून त्यांना मोटारसायकल आडवी मारुन त्यांचे ताब्यातील ८०० ग्रॅम वजनाची सोन्याचे दागीने असलेली  सॅक जबरीने चोरण्याचाप्रयत्न केला परंतु फिर्यादी व त्यांचे सहकारी गाडीवरुन पडल्याने चोरटयांना सॅक चोरता आली नाही. अशा मजकुरची तक्रार दाखल
केली.त्याबाबत वाकड पो.स्टे.गु.रजि. नं.९०१/२०२३ भादवि कलम ३९३,३४१, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात  आला.
घटनेचे गांर्भीय ओळखुन  गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाकड पोलिस ठाणे यांनी त्यांचे अधिनस्थ असलेल्या तपास पथकातील  सपोनि संतोष पाटील, पोउपनि. सचिन चव्हाण यांना सोबतचे पोलिस अंमलदार यांना पारंपारीक व तांत्रीक तपासाद्वारे चोरटयांचा शोध घेवून त्यांना अटक करणेबाबत सुचना दिल्या.तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सिसीटीव्ही फुटेजचे आधारे तपास सुरु केला असता त्यांना सदरचे दोन चोरटयांचे फुटेज मिळाले. ते विश्वासु बातमीदारांना दाखविले असता त्यांनी सदरची मुले चिखली भागातील असल्याचे सांगीतल्याने
चिखली भागात जावुन तेथुन





१) किशोर सुरेश भिसे वय २२ वर्षे रा. बी / २३ / ४०२, घरकुल चिखली पुणे



२) शमशाद रज्जब अलीशाह वय २० वर्षे रा. हारगुडे वस्ती, चिखली पुणे यांना गुन्हयात वापरलेल्या स्प्लेण्डर मोटार सायकल नं. एमएच १४. केएल.९९०६सह ताब्यात घेतले त्यांचेकडे तपास केला असता त्यांनी आणखी दोन साथीदार असलेचे सांगीतले. त्यामुळे चिखलीतुन



३) अभिराजजोखुराम कोरी वय २८ वर्षे रा. हारगुडे वस्ती चिखली पुणे

४) मुस्तफा ऊर्फ गणेश आस्लम शेख वय २३ वर्षे रा. हारगुडेवस्ती,
चिखली पुणे

यांना स्प्लेण्डर प्लस मोटार सायकल नं. एमएच.१४. जेक्यु. ११०९ सह ताब्यात घेतले. आरोपींकडे अधिक तपास केला असता त्यांनी गुन्हयाची कबुली देवुन सांगीतले की,  सुनिल बाळकृष्ण वाडेकर वय ४५ वर्षे रा. होळकर चाळीत भाडयाने,पाण्याचे टाकीजवळ आळंदी ता.खेड जि. पुणे हा सोनार असुन त्यांने आम्हाला सदरचे ८०० ग्रॅम सोन्याबाबत संपुर्ण माहीती देवून ते लुटण्याचा कट रचला आहे असे सांगीतले. त्यामुळे सदरचे सोनारास देखील भोसरी भागातुन अटक केली. तपासादरम्यान सदरचा गुन्हा हा कट रचुन केलेचे तपासात निष्पन्न झाले असल्याने दाखल गुन्हयास भादवि कलम १२० (ब) चा अंतर्भाव करणेत आला आहे.
सदरची कारवाई  विनयकुमार चौबे पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड, डॅा. संजय शिंदे सह पोलिसआयुक्त, वसंत परदेशी, अपर पोलिस आयुक्त,  डॉ. काकासाहेब डोळे पोलिस उप आयुक्त, परि २ पिंपरी-चिंचवड,  डॉ. विशाल हिरे, सहा. पोलिस आयुक्त वाकड विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली गणेश जवादवाड वरिष्ठ पोलिस निरीक्षक,  रामचंद्र घाडगे पोलिस निरीक्षक (गुन्हे), सपोनि संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण,सफौ. बाबाजान इनामदार, . राजेंद्र काळे, पोहवा वंदु गिरे, संदीप गवारी, अतिश जाधव, पोना. अतिक शेख,प्रशांत गिलबीले, पोशि. भास्कर भारती, सौदागर लामतुरे, स्वप्निल लोखंडे यांनी मिळून केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!