
PMPL च्या बसमधे चोरी करणारी महीला लोणीकंद पोलिसांच्या जाळ्यात
लोणीकंद(पुणे शहर)- पीएमपीएलच्या बसेस मध्ये गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या पर्स मधुन चोरी मोबाईल चोरी, पाकिटमारी असे प्रकार सुरु झाल्याची माहिती लोणीकंद पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने नागरीकांच्या मुल्यवान वस्तूंचे संरक्षण व्हावे व या घटनांना प्रभावी पायबंद बसावा म्हणुन लोणीकंद तपास पथकाचे अंमलदार यांना सदर परीसरात पेट्रोलिंग व गोपनिय लक्ष ठेवणे कामी पाठवण्यात येत होते. दिनांक ०३/०९/२०२३ रोजी लोणीकंद पोस्टेचे पोशि पांडुरंग माने व पोशि दिपक कोकरे यांना वेशांतर करून पाळत ठेवणे कामी पीएमपीएल बस स्टॉफ केसनंद फाटा वाघोली येथे पाठविण्यात आले होते. सुमारे दोन वाजण्याचे सुमारास यांनी पाहिले की, एक महिला तिच्या पती समवेत पीएमपीएलच्या बस मध्ये चढली असता त्यांना एका पुरुषाने जबरदस्ती करून त्या पुरुषासोबत असणा-या महीलेने त्यांचे पाकिट काढून घेतले आणि तेथून पळण्याचा प्रयत्न केला. परंतु, आरडा ओरडा ऐकू आल्याने तेथुन काही अंतरावर टेहाळणी वर असणारे पोलिस अंमलदार माने व कोकरे हे गर्दीतून धावत घटनास्थळावर आले परंतु गर्दीचा फायदा घेवून त्यातील तरुण पसार झाला तसेच तातडीने गर्दीमध्ये शोध घेत पोलिस अंमलदार माने व कोकरे यांनी एका संशयित महिलेला ताब्यात घेतले व तिच्याकडून चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत करण्यात आलेली आहे. सदर घटने बाबत लोणीकंद पोलिस स्टेशनला गु.र.नं ७११ /
२०२३ भादवी कलम ३९२, ३२३, ३४ प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा
दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयामध्ये या महिलेस
अटक करण्यात आली आहे. तपास पथकाचे कर्मचारी उर्वरीत
आरोपीचा शोध घेत आहेत.
सदर कारवाईचे नियोजन वरीष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काइंगडे पोनि गुन्हे मास्ती पाटील, सिमा ढाकणे यांनी केली आहे.पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहा. पोलिस आयुक्त संजय पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सदर सापळा रचण्यामध्ये सपोनि रविंद्र गोडसे व सपोनि गजानन जाधव तसेच लोणीकंद तपास पथकाचे सर्व अंमलदार यांनी मोलाचा वाटा उचलला आहे.सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनी राजगुरु हे करत आहेत.




