
बेकायदेशीर देशी कट्टा बाळगणार्याच्या भारती विद्यापीठ पोलिसांनी आवळल्या मुसक्या…
भारती विद्यापीठ(पुणे शहर) सायली भोंडे – सवीस्तर व्रुत्त असे
दिनांक २०/११/२०२३ रोजी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे दैनंदिन कर्तव्य करीत असताना पोलिस अंमलदार चंतन गोरे, महेश बारवकर, निलेश जमदाडे यांना त्यांचे बातमीदारामार्फेतीने बातमी मिळाली की, नवीन हायवेवरील दरी पुलाजवळ एक इसम गावठी कट्टा घेवून थांबला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनकडील तपास पथकाचं अधिकारी व अंमलदार यांनी जांभुळवाडी दरीपुलाचे खालील बाजुस जावुन बातमीप्रमाने इसमाचा शोध घेतला असता तेथे इसम
विजयकुमार तुळशीराम शिंदे, वय ३१ वर्षे, धंदा गवंडीकाम, रा. भुगाव, माताळवाडी फाटा डोंगरे


यांचेकडे भाडयाने, ता. मुळशी, जि. पुणे हा त्याचे ताब्यात एक ४०,०००/- रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल व २००/- रुपये किंमतीचे १ जिवंत काडतुस असा एकुण ४०,२००/- रुपयांचे मुद्देमालासह मिळुन आल्याने ते जप्त करण्यात आले असुन आरोपी विरुध्द भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन गुन्हा रजि नंबर ७५३/२०२३, भारतीय हत्याराचा अधिनियम कलम ३ सह २५ महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३० (९) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी रितेशकुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर, संदीप कर्णिक, सह आयुक्त, पुणे शहर, प्रविणकुमार पाटील, अपर पोलिस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, श्रीमती स्मार्तना पाटील पोलिस उप आयुक्त परिमंडळ २, नारायण शिरगावकर , सहाय्यक पोलिस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलिस स्टेशनकडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, तसेच पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ, पोलिस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलिस अंमलदार चेतन गोरे, महेश बारवकर, सचिन सरपाले, निलेश जमदाडे, शैलेश साठे, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, हर्पल शिंदे, अवधतु जमदाडे, अभिजीत जाधव, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, आशिप गायकवाड, अभिनय चौधरी, राहुल तांबे. विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.



