
सराईत चोरटा असणारा विधिसंघर्षीत बालक भारती विद्यापीठ पोलिसांच्या ताब्यात,चोरी केलेले ८ मोटारसायकल व २४ मोबाईल केले हस्तगत….
पुणे(सायली भोंडे) – सवीस्तर व्रुत्त असे की भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन हद्दीत चोरीच्या गुन्हयांचे प्रमाण वाढल्यामुळे वरीष्ठांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना चोरीच्या गुन्हयांतील अज्ञात आरोपीतांचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार
भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन गुन्हा रजि नंबर ७६८/२०२३, भादंवि कलम ३७९ या गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना पोलिस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, अवधुत जमदाडे, आशिष गायकवाड यांना सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील विधीसंघर्षीत बालकाने केला असल्याची बातमी मिळाली. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार सदर बालकाचा शोध घेत असताना तो कात्रज कोंढवा रोड, गोकुळनगर, गल्ली नंबर ४, पुणे येथे दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.१२.एन.क्यु.४६७६ व १२ मोबाईल फोनसहीत मिळुन आल्याने त्याचेकडे त्याबाबत तपास करता त्याने दुचाकी गाडी व मोबाईल फोन हे चोरी केल्याची कबुली दिल्याने ते पंचनाम्याप्रमाने जप्त केले आहेत.
त्यानंतर बालकाकडे अधिक तपास करता त्याने पुणे शहर व आजुबाजुच्या भागातुन आणखीन दुचाकी गाड्या चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यानुसार बालकाने सांगितल्या ठिकाणाहुन दुचाकी गाडया जप्त केल्या आहेत. वरील प्रमाणे बालकाकडुन एकुण ८ दुचाकी वाहने व १२ मोबाईल फोन असा एकुण ४,१५,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन त्यावरुन खालील प्रमाणे गुन्हे उघड करण्यात आले
१. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन गुन्हा रजि नंबर ७६८/२०२३, भादंवि कलम ३७९
२. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन गुन्हा रजि नंबर ७७० / २०२३, भादंवि कलम ३७९ अन्वये
३. शिरवळ पोलिस स्टेशन, सातारा गुन्हा रजि नंबर ३०२/२०२३, भादंवि कलम ३७९
४. लोणंद पोलिस स्टेशन, सातारा गुन्हा रजि नंबर २४१/२०२३ भादंवि कलम ३७९
सदरची कामगिरी. रितेशकुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर, रामनाथ पोकळे (अतिरीक्त कार्यभार सह आयुक्त, पुणे शहर), प्रविणकुमार पाटील, अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, श्रीमती स्मार्तना पाटील पोलिस उप आयुक्त परिमंडळ २, मा. नारायण शिरगावकर , सहाय्यक पोलिस उपायुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलिस स्टेशनकडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, तसेच पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ,पोलिस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलिस अंमलदार मितेश चोरमोले, अवधतु जमदाडे, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, शैलेश साठे, चेतन गोरे, महेश बारावकर, मंगेश पवार, निलेश ढमढेरे, हर्षल शिंदे, अभिजीत
जाधव, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.


