
पुणे क्राईम – खडक पोलिस स्टेशन हद्दीत मध्यरात्री घरात घुसुन गोळ्या झाडुन केला खुन…
पुणे – पुण्यात रविवारी मध्यरात्री गोळी झाडून एकाचा खून करण्यात आल्याची घटना घडलीय. गोळीबाराच्या या घटनेने शहर हादरले असून खडक पोलिस स्टेशनच्या हद्दीत हा खून झाला आहे
मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला. यात अनिल साहू याचा मृत्यू झाला.
याबाबत मिळालेली थोडक्यात माहीती अशी की, अनिल साहू हे
घोरपडे पेठेतील सिंहगड गॅरेज चौकात राहत होते. मध्यरात्रीच्या सुमारास अनिल साहू गाढ झोपेत असताना अज्ञात व्यक्ती घरात आल्या. घरात शिरून त्यांनी साहू यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. हा प्रकार घडला तेव्हा साहू यांचे कुटुंबीय देखील घरात होते. गोळ्या झाडल्या नंतर हल्लेखोर पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या
साहू यांना रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॅाक्टरांनी सांगितले.
मध्यरात्री घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच खडक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल कऱण्याची प्रक्रिया सुरू आहे. खडक पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. खून नेमका कोणत्या
कारणाने झाला याचाही तपास केला जात आहे.


