पर्वती पोलिसांनी कुठलाही पुरावा नसतांना तीन वर्षानंतर केला खुनाचा उलगडा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

पुणे(सायली भोंडे) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १७/०८/२०२० रोजी दुपारी १४.०० वाजण्याच्या सुमारास निखील माने वय १९ रा. जनता वसाहत गल्ली नंबर ८८ पर्वती, पुणे यांनी समक्ष पोलिस ठाण्यात येवून कळविले की, पर्वती टेकडीच्या वरील बाजूस जंगलामध्ये पडक्या पाण्याच्या टाकीजवळ तळजाई टेकडीकडे जाण्या-या रस्त्याच्या खालच्या बाजूस एका महिलेचे प्रेत पडलेले दिसत आहे. ते प्रेत कुजलेले असून त्या ठिकाणी भयंकर दुर्गंधी येत आहे. खबर मिळताच त्याठिकाणी तात्कालीन पोलिस पथक रवाना झाले. नमूद ठिकाणी अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयाच्या एका महिलेचा कुजलेला मृतदेह मिळून आला. पोलिसांनी तात्काळ दखल घेवून अकस्मात मयत दाखल करून तपास सुरु केला. प्रेताचे पोस्टमार्टम केल्यावर मृत महिलेचा मृत्यू चेह-यावर व छातीवर गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्याने तिला म्रुत घोषित करण्यात आले होते.

मृत महिला वर्णन एक अनोळखी महिला वय अंदाजे ३० ते ३५ अंगावर काळया रंगाचा ब्लाउज व नारंगी रंगाचा परकर हातात काचेच्या बांगडया व पायाच्या बोटांमध्ये जोडव्या तसेच डाव्या
हातावर सुरेखा असे मराठीत गोंदलेले. याबाबत तात्कालीन पोलिसांनी अकस्मात मयत दाखल करून तपास सुरु ठेवला होता.
परंतू नमूद महिलेची ओळख त्यांना पटू शकली नाही. दिनांक ०७/१२/२०२३ रोजी याबाबत पर्वती पोलिस ठाण्यात रितसर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याचा तपास वरीष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे हे करीत होते.
त्यानंतर वपोनि जयराम पायगुडे यांनी वरिष्ठांच्या मार्गदशानाखाली पर्वती पोलिसांची चार पथके तयार करुन संपूर्ण महाराष्ट्रातील मिसिंग महिलांचे रेकॉर्ड अत्यंत बारकाईने तसेच प्रत्यक्ष जावून शहर तसेच ग्रामीण हधीतील पोलिस स्टेशन्स येथे तपासले असता या वर्णनाची महिला हि दिनांक १२/०८/२०२० रोजी घरातून निघून गेली व परत आली नाही म्हणून रोहन संतोष चव्हाण यांनी राजगड पोलिस ठाणे अंकित खेड शिवापूर पोलिस आऊटपोस्ट येथे मिसींग तक्रार दाखल केल्याचे निष्पन्न झाले. याबाबत पोलिस निरीक्षक खोमणे व तपास पथकातील अंमलदार यांनी त्यानंतर रात्रंदिवस पाठपुरावा करुन रोहन चव्हाण यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे व बातमीदारांच्या सहाय्याने कोणत्याही प्रकारचा तांत्रिक पुरावा उपलब्ध नसताना पारंपारिक पध्दतीने तपास करुन एका संशयीत इसमास ताव्यात घेतले. त्याच्याकडे अत्यंत हुशारीने चौकशी करता त्याने त्याचे नाव सागर दादाहरी साठे वय २६ वर्षे रा. सुतारदरा, कोथरुड, पुणे मुळ रा. पाटील इस्टेट, गल्ली नंबर ०५, शिवाजीनगर, पुणे असे असल्याचे सांगून त्याने त्याच्या ओळखीची महिला सुरेखा संतोष चव्हाण वय ३६ वर्षे रा. वेताळनगर, शिवापूरवाडा ता. हवेली.
जि. पुणे हिचा तत्कालीन वादातून व पैशासाठी खून केल्याचे कबुल केल्याने पर्वती पोलिस स्टेशन गु.र. नं ३६८ / २०२३ भादंवि कलम ३०२ मध्ये अटक करण्यात आली आहे.
नमूद गुन्हयात सर्वप्रथम तिची ओळख पटणे हे महत्वाचे होते तसेच मयत महिला तसेच आरोपी यांचेवावत काहीएक माहिती उपलब्ध नसताना पारंपारिक पध्दतीने पोलीस तपास करुन दोनच दिवसात पर्वती पोलिस ठाण्याच्या पथकाने वरील गुन्हा उघडकीस आणला आहे. पुढील तपास वपोनि जयराम पायगुडे हे करीत आहेत.
सदरची कामगीरी ही  अप्पर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त परिमंडळ ३. सुहेल शर्मा, सहायक पोलिस आयुक्त, सिंहगड विभाग आप्पासाहेब शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली व.पो.नि जयराम पायगुडे, पो. नि. गुन्हे
विजय खोमणे, पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे, पोलिस अंमलदार राजू जाधव, कुंदन शिंदे, नवनाथ भोसले, प्रशांत शिंदे, दयानंद तेलंगे, अंनिस तांबोळी, अमित सुर्वे, सद्याम शेख, ज्ञानेश्वर
शिंदे, सुर्या जाधव यांनी केलेली आहे.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!