बेकायदेशीररित्या पिस्तुल खरेदी करुन हाताळतांना १ जखमी…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

उत्तमनगर(पुणे)–  धक्कादायक घटना समोर आली आहे बेकायदेशीररित्या  केलेले पिस्तूल हाताळताना त्यातून उडालेली गोळी मित्राच्या मानेला चाटून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. खडकवासला परिसरातील सांगरुण गावामध्ये हि घटना घडली आहे. अभय छगन वाईकर (22) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी आविष्कार उर्फ मोन्या तुकाराम धनवडे (19, रा. सांगरुण, ता.हवेली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. वाईकर याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अभय वाईकर आणि आविष्कार धनवडे मित्र आहेत. दोघे खडकवासला परिसरातील सांगरुण गावात राहायला आहेत. वाईकरने देशी बनावटीचे पिस्तूल खरेदी केले होते. तो धनवडे याला ते पिस्तूल दाखवित असताना धनवडे याच्याकडून पिस्तूलाचा चाप ओढला गेला. पिस्तुलातून सुटलेली गोळी वाईकरच्या मानेला चाटून गेली. या घटनेत
वाईकर गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने एरंडवणे भागातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक शुभांगी पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!