पुण्यातुन फरार झालेला दहशतवादी आलम NIA च्या ताब्यात,
पुणे – बहुचर्चित पुणे इसिस मॉडयुल प्रकरणातील पुणे पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) त्याला अटक केली गेली
आहे. पुणे इसिस मॉड्युल प्रकरणातील ही आठवी अटक आहे. दहशतवादी शाहनवाज आलम याला झारखंडमधून अटक झाली आहे, तो पुण्यातून पळून गेला होता. स्फोटक बनवण्याचं प्रशिक्षण देणं, ट्रेनिंग कॅम्प आयोजित करणं या प्रकरणांमध्ये तो वॉन्टेड होता.
आलम गेल्या तीन महिन्यांपासून फरार होता. त्याच्याविरुद्ध दिल्लीत दहशतवादी कृत्य केल्याचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. गेल्याच महिन्यात दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने त्याला पकडलं. त्यानंतर आता एनआयएने पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून त्याला अटक
केली. जुलै महिन्यात कोथरूड येथे दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. तेव्हाच शाहनवाज आलम पसार झाला होता. त्याचा दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय सहभाग आढळून आला आहे.आलम हा लपण्याचं ठिकाण शोधण्यापासून शस्त्र चालवण्याचे
आणि स्फोटकांचे सराव वर्ग आयोजित करण्यात त्याचा सहभाग होता. पुण्यातून फरार झालेल्या मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आलमला महिनाभरापूर्वी दिल्ली पोलिसांनी अटक केली. एनआयएने या दहशतवाद्यावर तीन लाख रुपयांचं बक्षीसही ठेवलं होतं.
दहशतवादी शाहनवाज आलम हा इंजिनिअर असल्याचं समोर आलं आहे. तो पुणे इसिस मॉडयुल प्रकरणात मोस्ट वॉन्टेड दहशतवादी होता. पुणे पोलिसांच्या ताब्यातून फरार झाल्यानंतर तो दिल्लीमध्ये खोली घेऊन राहात असल्याचं समोर आलं. अखेर त्याला अटक
करण्यात आला.