ललित पाटील प्रकरणात आणखी एक मोठी अपडेट,फरार होण्यास मदत करणारा कोणी दुसराच???

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

पुणे – कुख्यात ड्रग माफिया ललित पाटील ससून रुग्णालयातून फरार झाल्यानंतर पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. मात्र त्यानंतर पुणे पोलिसांनी आपली सूत्रे वेगाने हलवत ललित पाटीलला फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या त्याच्या दोन मैत्रिणींना नाशिकमधून अटक केली होती.
त्यानंतर आता पुणे पोलिसांनी पुण्यातील उद्योगपती आणि रोझरी स्कूलचे संचालक विनय अरहाना यांना अटक केली आहे. ईडीने अटक केल्यानंतर विनय अरहाना सध्या येरवडा कारागृहात होते. पुणे पोलिसांनी त्याला तेथून अटक केली आहे.

रोझरी एज्युकेशन ग्रुपचे संचालक विनय अरहाना यांना अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने बँक फसवणूक प्रकरणात अटक केली होती. सध्या तो येरवडा कारागृहात आहे. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याठिकाणीच त्याची ललित पाटील याच्याशी ओळख झाली. दरम्यान, त्याने ललित पाटीलला पळून जाण्यासही मदत केल्याचे तपासादरम्यान पोलिसांना आढळून आले. यानंतर या
प्रकरणी पुढील तपासणी करण्यासाठी पुणे पोलिसांनी विनय अरहाना याच्या कोठडीची मागणी केली. न्यायालयाने पुणे पोलिसांना अरहानला ताब्यात घेण्याची परवानगी दिली. यानंतर पुणे पोलिसांनी अरहानाला येरवडा कारागृहातून अटक केली.





ललित पाटील आणि विनय अरहाना या दोघांची ओळख ससून हॉस्पिटलच्या वॉर्ड क्रमांक 16 मध्ये झाली होती,जिथे दोघांवर उपचार सुरू होते. हळूहळू दोघांमध्ये ओळख वाढत गेली आणि विनय अरहाना याने ललित पाटीलला पळून जाण्यास मदत केल्याचे तपासात समोर आले आहे. ललित पाटील ससून रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर पंचतारांकित हॉटेलमध्ये गेला आणि तेथून तो रिक्षाने सोमवार पेठेत गेले. याठिकाणी अरहानाचा चालक दत्ता डोके याने ललित पाटीलला त्यांच्या कारमधून पुण्यातील रावेत येथे नेले. त्याठिकाणी दत्ता डोके याने विनय
अरहानाच्या सांगण्यावरून ललित पाटील याला दहा हजार रुपये दिले. ते पैसे घेऊन ललित आधी मुंबईला गेला आणि तेथून तो नाशिकला गेला आणि गायब झाला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!