अहमदनगर येथील सराईत मोटारसायकल चोरट्यांना पुणे स्थानिक गुन्हे शाखेने मुद्देमालासह घेतले ताब्यात,१६ गुन्हे केले उघड…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

नारायणगाव (पुणे ग्रामीण) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की 
खेड- जुन्नर उपविभागात मोटार सायकल चोरीचे गुन्हयांमध्ये वाढ झाली होती. त्या अनुषंगाने पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकीत  गोयल यांनी सदर मोटार सायकल गुन्ह्यांचा तपास करून लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. पथकाने मोटार सायकल
चोरीचे गुन्हयांमध्ये जामीनावर सुटलेले आरोपींना तपासण्यास सुरूवात केली असता गोपनीय बातमीदारांकडून बातमी मिळाली की, इसम नामे संदीप दुधवडे, तुषार केदार, भाऊसाहेब दुधवडे हे काही कामधंदा करत नसून त्यांच्याकडे वेगवेगळ्या मोटरसायकल असतात. मिळालेल्या बातमीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित इसमांची माहिती घेतली असता ते नारायणगाव येथील नंबरवाडी या ठिकाणी येणार असल्याने सापळा लावून
1) संदीप बारकू दुधवडे वय 18 रा. म्हसोबा झाप ता. पारनेर

2) तुषार पांडुरंग केदार व वय 22 रा. पोखरी पवळदरा
ता. पारनेर जि. अहमदनगर





यांना ताब्यात घेतले, चौकशीत त्यांनी खेड, नारायणगाव,आळेफाटा, जुन्नर परिसरातुन तसेच नगर भागातून काही मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली असून गुन्हे करताना त्यांचे सोबत त्यांचा
तिसरा साथीदार  भाऊसाहेब गंगाराम दुधवडे हा असल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांनी दोन घरफोडया केल्या असल्याचे सांगितले . सदर आरोपी हे रात्रीचे वेळी एकत्र येवून मजूरी कामासाठी जातो असे घरी सांगून विशेषत: स्प्लेंडर मोटार सायकलची चोरी करत असे. त्यांनी खालीलप्रमाणे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून त्यांचे कडून एकूण १३ मोटार सायकल ११ लाख ५० हजार रू. चालू बाजारभाव किंमतीच्या हस्तगत
करण्यात  आलेल्या आहे.
उघडकीस आलेले गुन्हे



1) नारायणगाव पोस्टे गु.र.नं 866/2023 भादवि क.379
2) जुन्नर पोस्टे गु.र.नं 497/2023 भादवि क. 379
3)आळेफाटा पोस्टे गु.र.नं 309/2023 भादवि 379
4)आळेफाटा पोस्टे गुरनं 674/2023 भादविक. 379 
5)पारगाव पोस्टे गु.र.नं 100/2023 भादवि क. 379 
6)खेड पोस्टे गु.र.नं 862/2023 भादवि क. 379
7)खेड पोस्टे गु.र.नं. 896/2023 भादवि क. 379
8)खेड पोस्टे गु.र.नं 928/2023 भादवि क. 379
 9)खेड पोस्टे गु.र.नं 999/2023 भादविक. 379
10)अहमदनगर ता पोस्टे गुरनं 798/23 भादवि 379
11)अकोले पोस्टे (अ.नगर) गु.र.नं. 601/2023 भादवि 379
12)आळेफाटा पोस्टे गुरनं 393/2020 भादविक 379
13)खेड पोस्टे गु.र.नं. 593 / 2023 भादवि क. 379
14)नारायणगाव पोस्टे गु.र.नं 333/2023 भादवि क.379
15)घोडेगाव पोस्टे गु.र.नं 303/2023 भादवि क.457,380,34
16)अकोले (अ.नगर) पोस्टे गु.र.नं 464/2023 भादवि 457,380



स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण कडून सन २०२३ मध्ये चोरी गेलेल्या एकूण ७० मोटार सायकल हस्तगत केलेल्या असून ४६ मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अंकीत गोयल,  पुणे ग्रामीण, अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे पुणे विभाग, उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे
पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, नारायणगाव पो स्टे चे सपोनि महादेव शेलार, स्था.गु.शा. कडील पो.स.ई. अभिजीत सावंत, पोलीस अंमलदार दिपक साबळे, विक्रम तापकीर, राजू मोमीण, अतुल डेरे, संदिप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर यांनी केली आहे. आरोपी सध्या पोलिस कोठडी रिमांड मध्ये असून पुढील तपास
नारायणगाव पोलीस स्टेशन करत आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!