सहाय्यक पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांचे पथकाचा मटका जुगार अड्डयावर छापा….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

सहा. पोलिस अधीक्षक  सत्यसाई कार्तीक व वडगाव मावळ पोलिस स्टेशन याची मटका,जुगारवर धडक कारवाई 71305/- मुद्देमाल जप्त….

लोणावळा(पुणे ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की,लोणावळा उपविभागात व परीसरात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी म्हनुन सहाय्यक पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांनी गेल्य वर्षभरात आपले खबरींचे एक वेगळेच जाळे तयार केल्याचे चित्र दिसते आहे त्यानुसारच कि काय त्यांना  बातमीदारामार्फत
मिळालेल्या माहितीच्या आधारे वडगाव मावळ पोलिस स्टेशन हद्दीत वडगाव फाटा येथील हॉटेल जोर्तीलींग जवळ उंबराळी देवी ॲटो गॅरेज या ठिकाणी कल्याण मटका नावाचा जुगार चालु आहे.
त्याप्रमाणे  सत्यसाई कार्तीक यांनी त्यांचे कार्यालयातील पथक तसेच वडगाव मावळ पोलिस स्टेशन येथील पोलिस निरीक्षक कदम यांना कळविले, त्याप्रमाणे पोलिस निरीक्षक कदम यांनी
वडगाव मावळ पोलिस स्टेशन येथील पोलिस कर्मचारी सत्यसाई कार्तीक यांचे कार्यालयाकडील पथक असे मिळालेल्या बातमीचे ठिकाणी पाठवले. मिळालेल्या  बातमीच्या ठिकाणी पोलिस
कर्मचारी गेल्यानंतर त्या ठिकाणी उंबराळी ॲटो गॅरेजमध्ये एक इसम हातात तांबुस रंगाचे पावती पुस्तक व एक बॉल बेन घेवुन बसलेला दिसला त्यावेळी त्यास ताब्यात घेवुन नाव विचारले असता
त्यांनी त्याचे नाव रविंद्र मोरेश्वर हवालदार असे सांगितले व ते राकेश सतिश भोर यांचे मार्फतीने मटका चालवत आसल्याचे सांगितले. त्यांचे समोर इतर 6 इसम मटका खेळत आसताना मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांचेकडुन एकुण 71305 /- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदर कारवाई पुणे ग्रामीण  पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, पोलिस निरीक्षक  कदम, सपोनि सचिन राऊळ, पोउपनि  चव्हाण, भोसले,
पोहवा बनसोडे, पोहवा  कवडे, व वडगाव पोलिस स्टेशन कडील पोलीस कर्मचारी यांनी केली.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!