विनापरवाना अवैधरित्या पिस्टल बाळगणारा लोणावळा पोलिसांचे ताब्यात…
बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या इसमास पकडून एक गावठी पिस्टल व एक जीवंत राऊंड केले जप्त,लोणावळा ग्रामीण पोलिसांची कार्यवाही….
लोणावळा(पुणे ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की, अंकीत गोयल, पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण, मितेश गट्टे , अपर पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई
करण्याच्या सुचना सर्व पोलिस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी सत्यसाई कार्तीक, सहा. पोलिस अधीक्षक लोणावळा विभाग लोणावळा यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक भारत भोसले यांचे अधिपत्याखाली पोलिस स्टेशन हद्दीमध्ये विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करणेकरीता पथक नेमले आहे. दिनांक 26/12/2023 रोजी लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांना त्यांचे विश्वासातील बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक इसम स्वतःचे जवळ विनापरवाना पिस्टल घेवून फिरत असुन तो आज रोजी वरसोली येथील कचरा डेपोचे परीसरात भारत गॅस गोडाऊन जवळ येणार आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळताच वरीष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी सदर बाबत पोलिस उपनिरीक्षक भारत भोसले यांना मिळाले बातमीचा आशय व छापा कारवाईचा प्लॅन सांगून कारवाईचे आदेश दिले. त्याप्रमाणे पोलिस उपनिरीक्षक भारत भोसले हे तात्काळ त्यांचे सोबत असणारे स्टाफसह भारत गॅस गोडावून वरसोली येथे रवाना झाले. तेथे
बातमीतील वर्णनाचा एक इसम उभा असलेला दिसला. त्यास पोलीसांची चाहूल लागताच तो तेथून पळून जावू लागला
त्यावेळी पोलिस उपनिरीक्षक भारत भोसले यांच्या पथकाने अतिशय कुशल रितीने सदर इसमाचा पाठलाग करुन त्यास काही क्षणातच ताब्यात घेतले.त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव अविनाश उर्फ अवि कैलास आंबेकर वय 26 वर्षे राहणार देवळे तालुका मावळ जिल्हा पुणे
असे सांगीतले त्याची त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यातून गावठी बनावटीचे एक पिस्टल व एक जीवंत राऊंड असा एकूण 35,500 /- रुपयाचा माल हस्तगत करुन जप्त केला आहे. सदर बाबत लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं. 698/2023 भारतीय हत्यार कायदा कलम 3, 25 प्रमाणे गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई अंकीत गोयल पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण, . मितेश गट्टे, अपर पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण, सत्यसाई कार्तीक सहा. पोलिस अधीक्षक लोणावळा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर धुमाळ वरीष्ठ पोलिस निरीक्षक लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन यांच्या अधिपत्याखाली पोलिस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलिस हवालदार विजयकुमार मुंढे, नितीन कदम, संतोष शेळके, नापोशि गणेश होळकर, भुषण कदम,किशोर पवार, पोशि संजयदादा पंडीत, सिद्धेश्वर शिंदे, ऋषीकेश पंचरास यांनी सहभाग घेतला असुन तपासात सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण, अपर पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण व सहा. पोलीस अधीक्षक लोणावळा विभाग यांनी अभिनंदन
केले आहे.